सांगलीत 200 खाटांच्या हॉस्पीटलला मिळणार "ग्रीन' सिग्नल 

अजित झळके
Saturday, 15 August 2020

सांगली : येथे दोनशे खाटांच्या जिल्हा रुग्णालयासह महिला आणि शिशूसाठीच्या स्वतंत्र विभागाला लवकरच मान्यता मिळेल, असा विश्‍वास आमदार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केला.

सांगली : येथे दोनशे खाटांच्या जिल्हा रुग्णालयासह महिला आणि शिशूसाठीच्या स्वतंत्र विभागाला लवकरच मान्यता मिळेल, असा विश्‍वास आमदार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केला. त्याबाबत सोमवारी (ता. 17) दुपारी 3 वाजता नवी दिल्लीत अल्पसंख्यांक मंत्रालयात बैठक होणार आहे. त्यात या मागणीला हिरवा कंदील मिळण्याची अपेक्षा आहे. त्यात महिला आणि मुलांसाठी 100 स्वतंत्र खाटांचा प्रस्ताव आहे. 

सांगली विधानसभा क्षेत्रामध्ये सांगली येथे सन 2001 च्या लोकसंख्येवर आधारित आरोग्य विभागाच्या बृहुत आराखड्यानुसार मागणी करण्यात आली होती. 100 खाटांचे जिल्हा रुग्णालयासाठी 58 कोटी रुपये आणि 100 खाटांच्या महिला व बाल रुग्णालयासाठी 57 कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव आहे. 

तो राज्य शासनाच्या आरेग्य विभागाकडे प्रलंबित होता. त्याबाबत आमदार गाडगीळ यांनी 2018 पासून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभाग खात्याचे मंत्री आणि सचिवांकडे पाठपुरावा केला. त्यामुळे आज या विषया संदर्भात राज्यातील विविध जिल्ह्यातील सात हॉस्पिटलचे प्रस्ताव प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागाकडे प्राप्त झालेले आहेत, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्यांक कार्यमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. 

आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या सांगली येथील हॉस्पिटलच्या मागणी संदर्भात सोमवारी दुपारी 3 वाजता अल्पसंख्यांक कार्य मंत्रालय नवी दिल्ली येथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आमदार गाडगीळ यांच्या हॉस्पिटलच्या मागणीला हिरवा कंदील मिळण्याची शक्‍यता आहे. तसेच या हॉस्पिटलच्या प्रस्तावाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. हॉस्पिटलला मंजुरी मिळण्यासाठी आपणाकडून संबंधित अधिकाऱ्यांना शिफारस करावी, अशी विनंती आमदार गाडगीळ यांनी श्री. गडकरी यांना केली आहे. त्यामुळे या प्रस्तावाला लवकरच हिरवा कंदील मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The 200-bed hospital in Sangli will get a "green" signal