जिल्ह्यात होणार 20 हजार रॅपिड अँटीजेन टेस्ट...संसर्ग टाळण्यासाठी टेस्ट करून घ्या : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

बलराज पवार
Sunday, 26 July 2020

सांगली-  रॅपिड अँटीजेन टेस्ट आयसीएमआरच्या मार्गदर्शकसुचनेनुसार सुरू आहेत. "चेस द व्हायरस' असा हा प्रयत्न असून जास्तीत जास्त लोकांची चाचणी करणे व कोरोना बाधित असणाऱ्या रूग्णांवर त्वरीत उपचार करून प्रादुर्भावाला अटकाव करणे असा टेस्टचा हेतू आहे. महापालिकेसह जिल्ह्यात वीस हजार टेस्ट करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. 

सांगली-  रॅपिड अँटीजेन टेस्ट आयसीएमआरच्या मार्गदर्शकसुचनेनुसार सुरू आहेत. "चेस द व्हायरस' असा हा प्रयत्न असून जास्तीत जास्त लोकांची चाचणी करणे व कोरोना बाधित असणाऱ्या रूग्णांवर त्वरीत उपचार करून प्रादुर्भावाला अटकाव करणे असा टेस्टचा हेतू आहे. महापालिकेसह जिल्ह्यात वीस हजार टेस्ट करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. 

डॉ. चौधरी म्हणाले, रॅपिड अँटीजेन टेस्ट विश्वासार्ह व गुणवत्तापूर्ण असून यामध्ये कोरोना निगेटीव्ह असणाऱ्या रूग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह येत नाही. नागरिकांनी या टेस्टसाठी न घाबरता सहकार्य करावे. रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरू आहेत, तेथे अडथळा निर्माण करू नये. स्वत:ची सुरक्षा व संसर्ग टाळणे यासाठी ही टेस्ट महत्वाची आहे. त्यामुळे ही टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. 

या चाचणीचा प्रोटोकॉल निश्‍चित आहे. कंटेन्मेंट झोन तसेच गर्दीचे परिसर, दाट लोकवस्ती या ठिकाणचे 50 वर्षांवरील तसेच विविध आजार असणारे नागरिक यांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात येते. लगतच्या सर्व जिल्ह्यात या चाचण्या होत आहेत. या चाचणीत पॉझिटीव्ह आलेला रुग्ण कोरोनाची लक्षणे नसली तरी निश्‍चित पॉझिटीव्ह असतो. रॅपिड अँटीजेन टेस्ट मोठ्या प्रमाणावर केल्याने संसर्गित संख्या शोधणे आणि त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करणे शक्‍य होते. सध्या त्या शहरी भागात सुरू आहेत. लवकरच ग्रामीण भागात सुरू करण्यात येत आहेत. जिल्ह्यात दहा हजार आणि महापालिका क्षेत्रात दहा हजार अशा एकूण वीस हजार रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात येणार आहे. या टेस्टबद्दल पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी दिला. 

हल्ले सहन करणार नाही 
येळवी (ता. जत) येथे रुग्णाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या आशा वर्करवर झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल घेतली असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत. कोरोनाबाबत कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचारी, पथकांवर हल्ले केल्यास सहन करणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी दिला. 

सुमारे आठशे बेडची तयारी 
कोरोना रुग्णांसाठी विविध हॉस्पिटलमध्ये सुमारे आठशे बेडची तयारी करण्यात आली आहे. मिरजेतील हॉस्पिटलमध्ये 100, भारती हॉस्पिटलमध्ये सध्या 82 बेड असून ही क्षमता 140पर्यंत वाढवली जाणार आहे. वॉन्लेस हॉस्पिटलमध्ये 100 आहेत. कुल्लोळी हॉस्पिटलमध्ये 40, घाडगे हॉस्पिटलमध्ये 70, "श्‍वास'मध्ये 30, मेहता हॉस्पिटलमध्ये 15, सेवासदनमध्ये 20, विवेकानंदमध्ये 50 बेडची तरतूद केली आहे. तर प्रकाश हॉस्पिटलमध्ये 100 बेडची तरतूद करण्याची सूचना केली आहे. 250 ते 300 बेड ऑक्‍सिजन पुरवठ्याची सुविधा असलेले आहेत, अशी माहिती डॉ. चौधरी यांनी दिली. प्रशासनाने निवडलेल्या खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांची सोय, त्यांची बिले यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासन अधिकारी नेमण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 20,000 Rapid Antigen Tests to be held in the district .Test to prevent infection : Collector Dr. Abhijeet Chaudhary