गेल्या दोन-तीन दिवसांत उन्हाचा कडाका वाढला असून द्राक्षाची गोडी वाढत आहे. १६ ब्रिक्सहून अधिक गोडी येत आहे. त्यामुळे युरोपीय (Europe) देशातील निर्यात आता दोन दिवसांपासून सुरू झालेली आहे.
सांगली : यंदा प्रतिकूल परिस्थितीतही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर द्राक्ष निर्यातीची संधी आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील दरासह निर्यातीचे दरही तेजीत आहेत. शेतकऱ्यांना (Farmers) आपत्तीतही सुपत्ती निर्माण झाली आहे. गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक निर्यात होणार आहे.