सांगली जिल्ह्यात दिवसभरात 21 कोरोना बाधित

घनशाम नवाथे 
Saturday, 30 January 2021

जिल्ह्यात आज झालेल्या आरटीपीसीआर आणि ऍन्टीजेन चाचण्यामध्ये 21 रुग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळले. तर आज दिवसभरात 11 जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्येने नुकतेच 48 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या रुग्णसंख्या 48 हजार 82 इतकी झाली आहे. 

सांगली : जिल्ह्यात आज झालेल्या आरटीपीसीआर आणि ऍन्टीजेन चाचण्यामध्ये 21 रुग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळले. तर आज दिवसभरात 11 जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्येने नुकतेच 48 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या रुग्णसंख्या 48 हजार 82 इतकी झाली आहे. 

गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या बऱ्यापैकी आटोक्‍यात आणण्यात आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाला यश आले आहे. तर दुसरीकडे सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर केला जात नाही. तसेच कोरोना प्रतिबंधक उपाय अनेकांकडून अमलात आणले जात नाही. त्यामुळे अद्यापही रुग्ण आढळून येत आहेत. 

आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचणीत 251 जणांचे स्वॅब तपासले. त्यामध्ये 10 जण कोरोना बाधित आढळले. तर ऍन्टीजेन चाचणीत 873 जणांचे स्वॅब तपासले. त्यामध्ये 11 जण कोरोना बाधित आढळले. दिवसभरात 21 जण बाधित आढळले त्यापैकी सहाजण महापालिका क्षेत्रातील आहेत. तसेच उर्वरित 15 रुग्णांमध्ये आटपाडी तालुक्‍यात 1, जत 4, खानापूर 4, मिरज 3, पलूस 1, तासगाव 1, वाळवा 1 याप्रमाणे रुग्ण आहेत. कडेगाव, कवठेमहांकाळ, शिराळा तालुक्‍यात आज एकही रुग्ण आढळला नाही. 

जिल्ह्यात सध्या 135 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 35 जण चिंताजनक आहेत. 35 पैकी 33 जण ऑक्‍सिजनवर आणि दोघेजण व्हेंटीलेटरवर आहेत. आज दिवसभरात 11 जण कोरोनामुक्त झाले. 

जिल्ह्यातील चित्र- 
आजअखेर एकूण बाधित- 48082 
आजअखेर बरे झालेले रुग्ण- 46198 
सध्या उपचार घेणारे रुग्ण- 135 
आजअखेर ग्रामीण रुग्ण- 24332 
आजअखेर शहरी रुग्ण- 7175 
महापालिका क्षेत्र रुग्ण- 16575 
 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 21 corona affected in Sangli district during the day