सांगली : जिल्ह्यात ऑक्टोबर २०२३ ते जून २०२४ या कालावधीत टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करून दुष्काळी पट्ट्यातील शेतीला पाणी दिले. या नऊ महिन्यात तिन्ही सिंचन योजनेतून तब्बल २१ टीएमसी पाणी उचलले. .Western Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रात १७ साखरसम्राट बनले आमदार.त्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने बळीराजा सुखावला असल्याने ऐन उन्हाळ्यात पिकांना पाणी मिळाल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली. या नऊ महिन्यांच्या कालावधीत सिंचनापोटी ७६ कोटी ५१ लाखांचे वीज बिल झाले आहे.जिल्ह्यात गतवर्षी पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. सिंचन योजना सुरू करून शेतीसाठी पाणी देण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली होती. .त्यातच जिल्हा प्रशासनानेही पाण्याची स्थितीचा आढावा घेत सिंचन योजना सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ऑक्टोबरपासून ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ सिंचन योजना सुरू केल्या. ऑक्टोबरमध्ये ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ सिंचन योजना सुरू करून १२.०४ टीएमसी इतके पाणी उचलले. त्यापैकी ४.९१ टीएमसी पाणी शेतीसाठी उपलब्ध करून दिले होते. .मात्र, सिंचन योजनेतून दिलेले पाणी कमी पडू लागले. त्यामुळे पुन्हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी २०२४ या चार महिने सिंचन योजना सुरू ठेवली. या चार महिन्याच्या आवर्तनाच्या कालावधीत ७.४९ टीएमसी पाणी शेतीसाठी सोडले होते.जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार टप्प्याटप्प्यांनी सिंचन योजनांचे आवर्तन सुरु केले होते. त्यानुसार मार्च ते जून २०२४ या चार महिन्यात १६.६२ टीएमसी पाणी उचलून ९.३२ टीएमसी पाणी शेतीला दिले. .Leopard leap : झेप ससाण्याची... १५ दिवस ७,३०० कि.मी.; ‘सॅटेलाईट टॅग’मुळे नोंद : कडेगावला घेतली विश्रांती .ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजना तब्बल नऊ महिने सुरू ठेवल्या. या आवर्तनातून मिरज, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, विटा, खानापूर, तासगाव तालुक्यातील शेतीला पाणी उपलब्ध करून दिल्याने सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी मिळाल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली. या नऊ महिन्यांच्या कालावधीत सिंचनापोटी ७६ कोटी ५१ लाखांचे वीज बिल झाले आहे. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.