
पुणे पदवीधर व शिक्षक विधानपरिषद निवडणुकीसाठी दुपारी बारावाजेपर्यंत मतदानास चांगला प्रतिसाद मिळाला. पदवीधर मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड, भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख, जनता दलाचे प्रा. शरद पाटील यांच्यासह स्थानिक उमेदवारांची संख्या मोठी असल्यामुळे चांगले मतदान झाले.
सांगली ः पुणे पदवीधर व शिक्षक विधानपरिषद निवडणुकीसाठी दुपारी बारावाजेपर्यंत मतदानास चांगला प्रतिसाद मिळाला. पदवीधर मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड, भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख, जनता दलाचे प्रा. शरद पाटील यांच्यासह स्थानिक उमेदवारांची संख्या मोठी असल्यामुळे चांगले मतदान झाले.
पदवीधरसाठी 22.51 टक्के तर शिक्षक मतदार संघासाठी 34.20 टक्के मतदान झाले. यापूर्वी पदवीधर मतदार संघात सांगली जिल्ह्यातून सर्वाधिक 35 टक्के मतदान झाले होते. शिक्षक मतदार संघासाठी मात्र 90 टक्केपर्यंत मतदान झाले आहे. या निवडणुकीत स्थानिक उमेदवार असल्यामुळे चुरशीने मतदान होत आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघ 62, तर पुणे शिक्षक मतदारसंघातील 35 उमेदवार रिंगणात आहेत. पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांतील 57 विधानसभा मतदारसंघाचा पसारा आहे. सांगली जिल्ह्यात पदवीधरसाठी 87 हजार 233 तर शिक्षकांसाठी 6 हजार 812 मतदार आहेत. मतदान छपाई केलेल्या मतपत्रिकांवर होत आहे.
कुठल्याही निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच वैद्यकीय अधिकारी मतदान केंद्रावर आहेत. मतदान केंद्रांवर पीपीई कीट, सॅनिटायझर, औषध-गोळ्यांची सोय आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क्स, थर्मल स्कॅनिंग आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने सर्व प्रकारची साधनं कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहेत.