25 वर्षात सांगलीची सराफ पेठ गुढीपाडव्याला तिसऱ्यांदा बंद 

अजित झळके 
गुरुवार, 26 मार्च 2020

सांगली  ः सांगलीची हळद जेवढी प्रसिद्ध तेवढीच सांगलीची सराफ, सुवर्णकार पेठ प्रसिद्ध आहे. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण या पेठेचा हक्काचा मानला जातो. यादिवशी कोट्यावधी रुपयांची सोने-चांदीची खरेदी होत असते. यावर्षी कोरोन विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने पेठ बंद राहिली आहे. गेल्या पंचवीस वर्षात गुढीपाडव्या सारख्या महत्त्वाच्या मुहूर्तावर सांगलीची सराफ पेठ बंद राहण्याची ही तिसरी वेळ आहे. 

सांगली  ः सांगलीची हळद जेवढी प्रसिद्ध तेवढीच सांगलीची सराफ, सुवर्णकार पेठ प्रसिद्ध आहे. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण या पेठेचा हक्काचा मानला जातो. यादिवशी कोट्यावधी रुपयांची सोने-चांदीची खरेदी होत असते. यावर्षी कोरोन विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने पेठ बंद राहिली आहे. गेल्या पंचवीस वर्षात गुढीपाडव्या सारख्या महत्त्वाच्या मुहूर्तावर सांगलीची सराफ पेठ बंद राहण्याची ही तिसरी वेळ आहे. 

सांगलीच्या सराफ पेठेत जिल्ह्यासह कर्नाटक सीमावर्ती भागातून काही हजार ग्राहक गुढीपाडव्याच्या खरेदीला येत असतात. यावर्षी देशभर ला×क डाऊन झाल्यामुळे गुढीपाडवा 100% सुना गेला आहे. 

याआधी सन 1996-97 साली पहिल्यांदा गुढीपाडव्याला सांगली सराफ पेठ बंद राहिली होती. त्यावेळी सांगली नगरपालिका होती आणि जकातीचा ठेका लढ्ढा नामक ठेकेदाराकडे देण्यात आला होता. त्यावेळच्या आठवणी सांगताना सराफ संघटनेचे ज्येष्ठ नेते किशोर पंडित म्हणाले, "ठेकेदाराने जकात वसुलीसाठी दडपशाहीचा पवित्रा घेतला होता. त्यांच्या गुंडांनी दादागिरी सुरू केली होती. सराफ पेठेत गुंडागिरी सुरू झाल्याने काहीवेळा झटापट झाली होती. सराफांना कारण नसताना खूप त्रास दिला जात होता. त्यामुळे जकात ठेका रद्द करावा यासाठी आम्ही आंदोलन उभे केले आणि त्या काळात दहा दिवस संपूर्ण सांगलीची पेठ बंद ठेवण्यात आली होती. त्यावेळी गुढीपाडवा होता आणि आंदोलन यशस्वी झाल्यानंतरच आम्ही माघार घेतली होती." 

सन 2016 साली पुन्हा एकदा गुढीपाडव्याला सांगलीची सराफ पेठ बंद ठेवण्याची वेळ आली. त्याआधी दोन वर्षे केंद्रात मोदी सरकार आले होते. या नव्या सरकारने सराफ व्यावसायिकांवर एक्‍साईज ड्युटी लागू केली होती. त्याला विरोध करत देशभरातील सराफ व्यावसायिकांनी बंद पुकारला होता. त्यावेळीही गुढीपाडवा हा महत्त्वाचा सण असूनही सांगलीतील सराफी दुकाने शटरडाऊन करण्यात आली होती. हे आंदोलन यशस्वी झाले.

केवळ मोठी उलाढाल असणाऱ्या सराफ व्यवसायिकांवरच एक्‍साईज ड्युटी लावण्याचा निर्णय झाला. छोटे व्यवसायिक या कर प्रणालीतून सुटल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते. आता तिसऱ्यांदा कोरुना विषाणूच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर सांगलीची सराफ पेठ आणि एकूणच देशात लोक डाऊन करण्यात आला आहे. या अत्यंत महत्त्वाच्या सनाला सराफ पेठ बंद असल्याने सुवर्ण खरेदी करू इच्छिणारा यांचा मात्र पुन्हा एकदा हिरमोड झाला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in 25 years, the Saraf Peth closed for a third time