सांगली जिल्ह्यात 255 कोरोनामुक्त; नवे 185 रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 October 2020

बाधितांची संख्या 44 हजार 755 झाली आहे. 1 हजार 880 जण उपचार घेत आहेत. चार जणांना मृत्यू झाला असून त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. 

सांगली ः जिल्ह्यात 255 जण कोरोनामुक्त झाले असून नवे 185 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. महापालिका क्षेत्रात बांधितांची संख्या घटली दिवसभरात 27 जणांना लागण झाली. बाधितांची संख्या 44 हजार 755 झाली आहे. 1 हजार 880 जण उपचार घेत आहेत. चार जणांना मृत्यू झाला असून त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. 

दिवसभरात 1130 आरटीपीसीआर तपासण्यात 84 बाधित आढळले. 2306 रॅपीड अँटीजेन तपासण्यात 102 जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. आटपाडी तालुक्‍यात 16, जतला 17, कडेगाव 27, कवठेमहांकाळ 11, खानापूर 13, मिरज 7, पलूस 10, शिराळा 9, तासगाव 30 तर वाळवा तालुक्‍यात 18 जणांना बाधा झाली. महापालिका क्षेत्रात सांगलीत 15 तर मिरजेत 12 रुग्ण आढळले. 

आज वाळवा तालुक्‍यातील एक आणि महापालिका क्षेत्रात एका अशा दोघांचा मृत्यू झाला. तर कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या 177 रुग्ण ऑक्‍सिजनवर आहेत. नॉन इन्व्हेंजीव व्हेंटिलेटरवर 35, हायफ्लो नेझल ऑक्‍सिजनवर 12, इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर 3 रुग्ण आहेत. परजिल्ह्यातील 1 रुग्ण आज दाखल झाले. एकूण 37 रुग्ण उपचार घेत आहेत. 
 

  • आजचे बाधित ः 185 
  • उपचाराखाली ः 1880 
  • बरे झालेले ः 41247 
  • एकूण मृत्यू ः 1628 
  • एकूण बाधित ः 44755 
  • चिंताजनक ः 227 
  • ग्रामीण बाधित ः 22174 
  • शहरी बाधित ः 6599 
  • मनपा क्षेत्र ः 15982 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 255 corona free in Sangli district; New 185 patients