esakal | जिल्ह्यात नवे 280 रूग्ण... 21 जणांचा मृत्यू : 241 कोरोनामुक्त; आठ हजाराचा टप्पा ओलांडला 
sakal

बोलून बातमी शोधा

CORONA.jpg

सांगली-  जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे नवे 280 रूग्ण आढळले. त्यापैकी 146 रूग्ण महापालिका क्षेत्रातील आहेत. जिल्ह्यातील रूग्णसंख्येने आज आठ हजाराचा टप्पा ओलांडला. एकुण रूग्णसंख्या 8022 वर पोहोचली. तर आज दिवसभरात जिल्ह्यातील 17 जणांचा आणि परजिल्ह्यातील चौघांचा कोरोनाने मृत्यू झाला. तर जिल्ह्यातील 241 जण कोरोनामुक्त झाले. 

जिल्ह्यात नवे 280 रूग्ण... 21 जणांचा मृत्यू : 241 कोरोनामुक्त; आठ हजाराचा टप्पा ओलांडला 

sakal_logo
By
घनश्‍याम नवाथे

सांगली-  जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे नवे 280 रूग्ण आढळले. त्यापैकी 146 रूग्ण महापालिका क्षेत्रातील आहेत. जिल्ह्यातील रूग्णसंख्येने आज आठ हजाराचा टप्पा ओलांडला. एकुण रूग्णसंख्या 8022 वर पोहोचली. तर आज दिवसभरात जिल्ह्यातील 17 जणांचा आणि परजिल्ह्यातील चौघांचा कोरोनाने मृत्यू झाला. तर जिल्ह्यातील 241 जण कोरोनामुक्त झाले. 

जिल्ह्यात जुलैपासून कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. तसेच कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. ऑगस्ट महिन्यातही रूग्ण वाढले असून 20 दिवसात जवळपास पाच हजारहून अधिक रूग्ण जिल्ह्यात वाढले आहेत. आज दिवसभरात 280 नवे रूग्ण आढळले. त्यापैकी 146 रूग्ण महापालिका क्षेत्रातील आहेत. पैकी 71 रूग्ण सांगलीतील आणि 75 रूग्ण मिरजेतील आहेत. तसेच ग्रामीण भागात आटपाडी तालुक्‍यात 5, जत तालुक्‍यात 12, कडेगाव 8, कवठेमहांकाळ 4, खानापूर 17, मिरज 38, पलूस 1, शिराळा 2, तासगाव 25, वाळवा तालुका 22 याप्रमाणे रूग्ण आढळले. आरटीपीसीआर तपासणीत 163 आणि ऍन्टीजेन चाचणीत 128 रूग्ण आढळले. यापैकी 11 रूग्ण परजिल्ह्यातील आहेत. 

आज दिवसभरात सांगलीतील दोन वृद्धांचा तसेच वृद्धेचा मृत्यू झाला. तसेच बुधगाव येथील वृद्ध, वाळवा येथील वृद्धा, तुंग येथील महिला, मिरज येथील चार पुरूष व महिला, हरिपूर येथील महिला, सावळवाडीतील वृद्ध, म्हैसाळ येथील पुरूष, डोंगरसोनी येथील पुरूष, इस्लामपूर येथील वृद्ध, माडग्याळ येथील पुरूष अशा 17 जणांचा मृत्यू झाला. आजअखेर जिल्ह्यातील 293 जणांचा मृत्यू झाला. तसेच जयसिंगपूर, रत्नागिरी, अथणी व शिरोळ या परजिल्ह्यातील रूग्णांचाही मृत्यू झाला. तर परजिल्ह्यातील 83 जणांचा आजअखेर मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील रूग्णसंख्येने आज 8 हजाराचा टप्पा ओलांडला. सध्या 346 रूग्ण चिंताजनक आहेत. त्यापैकी 262 जण ऑक्‍सिजनवर, 62 जण नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर, 15 जण नेझर ऑक्‍सिजनवर आणि 7 जण इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर आहेत. दिवसभरात 241 कोरोनामुक्त झाले. 
 

जिल्ह्यातील चित्र- 

 • आजअखेरचे एकुण पॉझिटीव्ह रूग्ण-8022 
 • सद्यस्थितीत उपचार घेणारे रूग्ण- 3152 
 • आजअखेर बरे झालेले रूग्ण- 4577 
 • आजअखेर जिल्ह्यातील मृत- 293 
 • परजिल्ह्यातील मृत रूग्ण- 83 
 • पॉझिटीव्हपैकी चिंताजनक रूग्ण- 346 
 • आजअखेर ग्रामीण रूग्ण- 2641 
 • आजअखेर शहरी रूग्ण-632 
 • महापालिका क्षेत्र रूग्ण- 4749 
   
loading image
go to top