

सांगली : मिरजेतील म्हैसाळ रस्त्यावरील उड्डाणपूल आणि मार्केट यार्डातील शेतकरी भवन गांजा विक्रीसाठी आलेल्या खालिद रियाज मोमीन (वय ३३, रा. अमर टॉकीजसमोर, ख्वॉजा झोपडपट्टी, मिरज), हुसेन ऊर्फ गुरुजी मैनुद्दीन मुल्ला (वय ४९, रा. अमननगर, मालगाव रस्ता, मिरज), हुसेन बादशहा सय्यद या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. तर मौला हसन टेमकर (रा. बिस्मिल्ला कॉलनी, मिरज), संदीप रास्ते (रा. विसापूर, ता. तासगाव) हे दोघे पसार आहेत. कारवाईत तीन किलो गांजासह ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.