'अभाविप' तर्फे ३०१ फुटी तिरंगा ध्वज एकात्मता पदयात्रा उत्साहात 

राजशेखर चौधरी
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

अक्कलकोट - अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा अक्कलकोट आणि सी.बी. खेडगी महाविद्यालय, अक्कलकोट यांच्या वतीने ७२ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आज अक्कलकोट शहरात प्रथमच ३०१ फुटी तिरंगा ध्वज एकात्मता पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडला.

अक्कलकोट - अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा अक्कलकोट आणि सी.बी. खेडगी महाविद्यालय, अक्कलकोट यांच्या वतीने ७२ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आज अक्कलकोट शहरात प्रथमच ३०१ फुटी तिरंगा ध्वज एकात्मता पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडला.

सामाजिक जाण आणि नागरिकांमध्ये देशा विषयी आदर निर्माण व्हावे, समता आणि बंधुतेचा प्रसार करण्याचे हा एक स्तुत्य उपक्रम अभाविप अक्कलकोट शाखेकढून राबवण्यात आला. या पदयात्रेचे उदघाटन अभाविपचे महाराष्ट्र प्रांत प्रदेशमंत्री अभिजित पाटील, नगराध्यक्षा शोभा खेडगी यांच्याहस्ते करण्यात आले. सदर पदयात्रेची सुरुवात खेडगी महाविद्यालय पासून सुरुवात झाले तर संपूर्ण गावामध्ये या पदयात्रेची स्वगात अत्यंत जोमात करण्यात आले. तर पदयात्रेची समारोप जाहीर सभेने करण्यात आले. या सभेत प्रदेश मंत्र्यांनी विद्यार्थ्याना देशभक्ती जागृतीबद्दल मार्गदर्शन केले.  या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, आकाश कलशेट्टी यांनी मांडली तर सूत्रसंचालन मयूर स्वामी यांनी केले तर आभार आकाश चव्हाण यांनी मानले.  या वेळी प्रमुख अतिथी म्हणून अक्कलकोट एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष शिवशरण खेडगी, प्राचार्य एस.सी.अडवितोट आणि बाळासाहेब मोरे उपस्थित होते. मंचावर प्रदेश सहमंत्री शुभम अग्रवाल, जिल्हा संयोजक प्रियांका पाटील, शहराध्यक्ष शसंगमेश्वर निंगदाळे, राहुल वाड़े, वर्षा वाडे, शरणय्या मसुती आदी उपस्थित होते.या वेळी महेश हिंडोळे, सुधीर माळशेट्टी, सद्दाम शेरीकर, चेतन जाधव, संतोष वगाले, प्रा.किसन झीपरे, प्रा.बी.एन.कोणदे, प्रा.डॉ.शंकर धडके, प्रा.सिद्धराम पाटील, प्रा.किशोर थोरे आणि प्रा.मछींद्र रुपनर आदी उपस्थित होते.

सदर पदयात्रा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी इरेश फताटे, बसवराज साखरे, प्रशांत कुलकर्णी, ओम कुलकर्णी, राहुल पावले, आदित्य जोशी, गुरु माळी, प्रसन्न गवंडी, प्रभाकर माळी, स्वप्नील स्वामी, रवी मंगरुळे, सुरज मसरे, प्रसाद खमितकर, संदेश कलबुर्गी आणि महेश स्वामी आदींनी परिश्रम घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 301-foot flag integrity padyatra by 'ABVIP'