सांगलीत कोविड उपचारांसाठी 32 कोटी निधी : डॉ. विश्वजीत कदम

सांगलीत कोविड उपचारांसाठी 32 कोटी निधी : डॉ. विश्वजीत कदम
Updated on

सांगली : जिल्हा नियोजन समितीच्या (Sangli District Planning Committee) निधीतून दहा टक्के निधी कोविड उपचारासाठी वापरण्यात येणार आहे. यामुळे सुमारे 30 ते 32 कोटी रुपये मिळतील. तसेच शासकीय रुग्णालयांसाठी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची(oxygen and ventilator)सुविधा उभारण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम (Dr Viswajit Kadam) यांनी दिली.आज जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कोरोनाबाबत चर्चा केली. त्यानंतर पत्रकार बैठकीत बोलताना त्यांनी जिल्ह्यासाठी पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध असल्याचे सांगितले.

32 crore Funding in sangli district planning for Covid treatment information by dr vishwajeet kadam

ते म्हणाले, दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता त्यानंतर पालकमंत्री जयंत पाटील, मी स्वतः आणि प्रशासनाने प्रयत्न करुन जिल्ह्यासाठी ४४ टन ऑक्सिजन उपलब्ध केला आहे. जिल्ह्याची गरज ४० टन ऑक्सिजनची आहे. जिल्ह्यासाठी पुरेसा ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असला तरीही जिल्ह्यासाठी आजच्या तारखेला १२०० डोस उपलब्ध आहेत. त्यातील ६०० खाजगी आणि ६०० शासकीय रुग्णालयांसाठी आहेत.शासनाच्या धोरणानुसार जिल्हा वार्षिक निधीतील दहा टक्के निधी हा कोविडसाठी खर्च करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्याच्या वार्षिक निधीतील दहा टक्के म्हणजेच सुमारे 30 ते 32 कोटी रुपये कोविडसाठी खर्च करण्यात येणार आहेत, असे डॉ. कदम म्हणाले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची गरज मोठी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांसाठी ऑक्सिजनची सोय करण्यात येणार आहे. मिरज शासकीय रुग्णालयासाठी 125 तर जत, विटा, आटपाडी, कडेगाव, पलूस, भिवघाट, चिंचणी वांगी येथील आरोग्य केंद्रासाठी प्रत्येकी 31 जंबो ऑक्सीजन सिलेंडर देण्यात येतील. माडग्याळ आणि कवठेमहांकाळसाठी प्रत्येकी 58 ऑक्सिजन सिलिंडर देण्यात येणार आहेत. यासाठी थोडा वेळ लागेल मात्र त्याची पूर्तता निश्चित करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.याबरोबरच व्हेंटिलेटरही उपलब्ध करण्यात येणार आहेत.

मिरज सिव्हील हॉस्पिटलसाठी 25 तर सांगली सिव्हीलसाठी 20 व्हेंटिलेटर उपलब्ध होणार आहेत. जिल्हा नियोजनमधून 15 व्हेंटिलेटर घेण्यात येतील. तसेच शासनाच्या धोरणानुसार आमदार निधीतूनही पाच व्हेंटिलेटर येणार आहेत. पुढील शनिवारपर्यंत सुमारे पन्नास व्हेंटिलेटर उपलब्ध होतील असे त्यांनी सांगितले.जिल्ह्याला कोविड लसीचा तुटवडा भासत असल्यामुळे लसीकरण व्यवस्थित होत नाही ही वस्तुस्थिती आहे. ही परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे याबाबत राज्य सरकार धोरणात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यात विशेष करून ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राधान्याने दुसरा डोस ज्यांना घ्यायचा आहे. त्यांना देण्यात येईल. असे डॉ. कदम म्हणाले. जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू असतानाही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.केंद्राने महाराष्ट्राला झुकते माप द्यावे.

भारताच्या कोविड संकटात सहकार्यासाठी परदेशातून मोठ्या प्रमाणात मदत येत आहे, मात्र महाराष्ट्राला त्याचा लाभ मिळत नाही, यावर बोलताना कदम म्हणाले, अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड आदी देशातून मदत आली आहे. पण ती जाते कुठे? आमचे एवढेच म्हणणे आहे की परकीय मदत वाटप करताना केंद्राने महाराष्ट्राला झुकते माप द्यावे.

'भारती' तर्फे पुणे, सांगलीत ऑक्सिजन निर्मिती प्लांट

भारतीय मेडिकल कॉलेज हॉस्पिटल तर्फे पुणे आणि सांगलीत ऑक्सीजन निर्मिती प्लांट उभारण्यात येणार आहेत. प्रत्येकी साडेचार कोटींचे हे प्लांट येत्या महिन्यात उभारले जातील. या ठिकाणी पाचशे लिटरचे प्रत्येकी तीन युनिट उभे केले जाणार आहेत. सध्या 'भारती'च्या वतीने वीस टनाचे ऑक्सीजन साठवणूक प्लांट उभे केले आहेत. त्याचा फायदा भारती हॉस्पिटल बरोबरच इतर शासकीय रुग्णालयातील रुग्णांना झाला आहे.

32 crore Funding in sangli district planning for Covid treatment information by dr vishwajeet kadam

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com