जिल्ह्यात 94 निवारा केंद्रात 36135 व्यक्तींना आसरा

nivara center.jpg
nivara center.jpg
Updated on: 

सांगली- रोजंदारीवरील मजूर, निराधार व्यक्ती, ऊस तोड मजूर, भटके लोक तसेच कायमस्वरूपी ज्यांना रहाण्याची आणि खाण्यापिण्याची सोय उपलब्ध नाही अशांसाठी ते सद्या ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी त्यांना आसरा देण्यासाठी निवारागृहे स्थापन करण्यात आली आहेत.

यामध्ये जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या 94 निवारा केंद्रामधून सद्यस्थितीत 36 हजार 135 लोकांची सोय करण्यात आली आहे. महानगरपालिका अंतर्गत 2 ठिकाणी कम्युनिटी किचन स्थापन करण्यात आले असून त्या अंतर्गत 892 लोकांना जेवण देण्यात येत आहे. 

जिल्ह्यात मिरज तालुक्‍यात 8 निवारा केंद्रामध्ये 1921 व्यक्ती, तासगाव तालुक्‍यात 1 निवारा केंद्रामध्ये 155 व्यक्ती, कवठेमहांकाळ तालुक्‍यात 2 निवारा केंद्रामध्ये 470 व्यक्ती, जत तालुक्‍यात 8 निवारा केंद्रामध्ये 310 व्यक्ती, खानापूर तालुक्‍यात 18 निवारा केंद्रात 2576 व्यक्ती, आटपाडी तालुक्‍यात 6 निवारा केंद्रात 788 व्यक्ती, पलूस तालुक्‍यात 8 निवारा केंद्रात 7648 व्यक्ती, कडेगाव तालुक्‍यात 18 निवारा केंद्रामध्ये 10 हजार 226 व्यक्ती, वाळवा तालुक्‍यात 18 केंद्रामध्ये 10 हजार 964 व्यक्ती, शिराळा तालुक्‍यात 2 केंद्रामध्ये 185 तर सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात 5 निवारा केंद्रामध्ये 892 व्यक्ती आहेत.

अशा एकूण 94 निवारा केंद्रामधून 36 हजार 135 व्यक्तींची सोय करण्यात आली आहे. यामध्ये साखर कारखाना कॅम्पमधील 31 हजार 81 ऊसतोड कामगारांचा समावेश आहे. तसेच 85 एनजीओंची निवारा केंद्रात खाद्यपदार्थ वितरणासाठी मदत होत आहे. निवारा केंद्रामध्ये आसरा देण्यात आलेल्या लोकांमध्ये हॉटेल कामगार, रोजंदारीवरील मजूर, निराधार व्यक्ती, ऊस तोड मजूर, भटके लोक असून या सर्वांना जेवण, औषधे त्याचबरोबर दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवल्या जात आहेत. वैद्यकीय पथकामार्फत त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. निवारा केंद्रात भरती करताना त्यांना ताप, खोकला, सर्दी अशी काही लक्षणे आहेत का याची तपासणी करण्यात आली आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची दक्षता प्रशासन घेत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Islampur Police Arrest Two Suspects in Alleged Assault Case
Ped Water Shortage
Mumbai Bengaluru Special Train
TET Exemption Plea Rejected
Marathi News Esakal
www.esakal.com