शहरात 37 नवे रुग्ण; सांगली-कुपवाड 32; मिरजेत 5 जणांना बाधा; बेघर केंद्रात आणखी चार पॉझिटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 July 2020

महापालिका क्षेत्रात आजवर रुग्णसंख्या 291 वर पोहचली आहे. रुग्णसंख्येत दिवसागणीक वाढ होत असल्याने खबरादीर घेण्याचे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. 

सांगली : महापालिका क्षेत्रात गेल्या चोवीस तासात आणखी 37 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये सांगली-कुपवाड शहरात 32, तर मिरजेत पाच नवे रुग्ण आहेत. सांगलीतील सावली बेघर निवारा केंद्रात आणखी चार जणांना लागण झाली आहे. महापालिका क्षेत्रात आजवर रुग्णसंख्या 291 वर पोहचली आहे. रुग्णसंख्येत दिवसागणीक वाढ होत असल्याने खबरादीर घेण्याचे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. 

आज दिवसभरात सांगली शहरातील कुंठेमळा येथे दोन, पाटील नगर कोल्हापूर रस्ता, यशवंतनगर, खणभाग, दत्तनगर, सांगलीवाडी, वानलेसवाडी, रमामातानगर, विजयनगर आणि कुपवाड येथे प्रत्येकी एक रुग्ण मिळून आले आहे.

माधवनगर रस्ता परिसरात दोन, शिंदे मळा परिसरात तीन, गुजरबोळे येथे सहा, चौगुले प्लॉट येथे दोन, दत्तनगर येथे तीन रुग्ण सापडले आहेत. तसेच सावली बेघर निवारा केंद्रातील आणखील चार जणांना लागण झाली आहे. मिरजेतील अंबिकानगर येथे तीन, माजी सैनिक वसाहत आणि गणेश तलाव येथे प्रत्येकी एक रुग्ण मिळून आले आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत 37 रुग्ण सापडल्याने घबराहट पसरली आहे. 

 

  • आजअखेरचे एकूण रुग्ण- 939 
  • महापालिका क्षेत्र रुग्ण- 291 

 
संपादन - बलराज पवार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 37 new patients in the city; Sangli-Kupwad 32; 5 injured in Miraj; Four more positives in the homeless center