-अजित झळके
सांगली : ग्रामीण भागातील तरुणांनी लघुउद्योगातून प्रगती साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी जिल्ह्यातून यंदा तब्बल ३ हजार ८०० प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राकडे दाखल झाले आहेत. ही विक्रमी संख्या आहे. पैकी ७०० प्रस्तावांना राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज मंजुरी देत मान्यता दिली आहे. मार्चअखेर आणखी १४०० प्रस्ताव मार्गी लावण्याचा जिल्हा उद्योग केंद्राचा प्रयत्न सुरू आहे.