esakal | सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या 39 हजार लस दाखल; दिवसभरात 20 हजार जणांना डोस

बोलून बातमी शोधा

39,000 corona vaccines filed in Sangli district; Dose to 20,000 people throughout the day

सांगली जिल्ह्यात शनिवारी आलेला 68 हजार लशींचा साठा संपला आहे. कोरानोच्या नवीन 39 हजार लशी आल्या.

सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या 39 हजार लस दाखल; दिवसभरात 20 हजार जणांना डोस
sakal_logo
By
विष्णू मोहिते

सांगली ः जिल्ह्यात शनिवारी आलेला 68 हजार लशींचा साठा संपला आहे. कोरानोच्या नवीन 39 हजार लशी आल्या. जिल्ह्यात लसीकरणाची मोहीम आता गतीने सुरू आहे. आज 20 हजार 385 जणांना लस देण्यात आली. 
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने लसीकरण गतीने सुरू केले आहे.

सरकारच्या आदेशनुसार जिल्ह्यात 45 वर्षावरील सुमारे 6 लाख 30 हजार नागरिक आहेत. सध्या जिल्ह्यात 227 केंद्रावरून लसीकरण सुरू आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात 2 लाख 430 कोविड लसी आल्या. यात 1 लाख 73 हजार 430 कोविशिल्ड तर 27 हजार कोव्हॅक्‍सीन लस होत्या. आजअखेर जिल्ह्यातील 3 लाख 8 हजार 864 जणांचा लसी दिल्या आहेत. परंतु गेल्या दोन दिवसांपूर्वी सर्व लसी संपल्या. परिणामी लसीकरण ठप्प झाले होते. 

लशी मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कसोशीने प्रयत्न केले. त्यामुळे शनिवारी पहाटे जिल्ह्यात 68 हजार लसीचे डोस आले. हे डोस तीन दिवसांत संपले. त्यामुळे मंगळवारपासून लसीकरण थांबणार होते. परंतु जिल्हा आरोग्य खात्याने पाठपुरावा करून पुन्हा 39 हजार लसी मागविल्या. या लसीचे वितरण जिल्हाभर करण्यात आले. ही लस दोनच दिवस पुरणार आहे. गुरुवारी पुन्हा साठा संपणार आहे. जिल्हा प्रशासनाने दोन लाख लशी द्याव्यात, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. 


कोरोना संसर्गात दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे शासकीय व खासगी लशीकरण केंद्रावर गर्दी वाढत आहे. गावागावातील लोकांमध्ये जागृती होत आहे. आतापर्यंत 3 लाख 13 हजारावर लशीकरण झाले आहे. सुमारे 25 हजाराहून अधिक लोकांना दुसरा डोस घेतला आहे. दररोज सरासरी 19 हजार लोक लस घेत होते. ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद आहे. कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे लशींना मागणी वाढली आहे. 

दिवसभरातील लसीकरण 
ग्रामीण - 15778 
शहर- 2072 
महापालिका- 2535 

संपादन : युवराज यादव