
दत्तवसाहत, गांधिनगर साईनगर मधील नागरीकांचा चाळीस वर्षे प्रलंबित असणारा 4, 6, 9 मधील भूखंड खरेदी विक्रीचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढू. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुधारित प्रस्ताव शासनास सादर करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी दिली.
आष्टा : दत्तवसाहत, गांधिनगर साईनगर मधील नागरीकांचा चाळीस वर्षे प्रलंबित असणारा 4, 6, 9 मधील भूखंड खरेदी विक्रीचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढू. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुधारित प्रस्ताव शासनास सादर करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी दिली.
दत्त वसाहत येथे सुधारित प्रस्तावाची माहिती देण्यासाठी नायिकांच्या आयोजित बैठकीत प्रांताधिकारी पाटील बोलत होते अप्पर तहसीलदार दिक्षांत देशपांडे विराज शिंदे नगराध्यक्षा स्नेहा माळी, उपनगराध्यक्ष प्रतिभा पेटारे, लोकप्रतिनिधी अर्जुन माने, प्रभाकर जाधव, दिलीपराव वग्यानी, माणिक शेळके प्रमुख उपस्थित होते प्रांताधिकारी पाटील म्हणाले येथील जमीन ही जुन्या अविभाज्य शर्थीचे आहे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता या जमिनीचे प्लॉट पाडून खरेदी-विक्री व्यवहार झाले आहेत.
जमीन खरेदी विक्री व्यवहारात शर्तभंग झाल्याच्या कारणाने महसूल प्रशासनाने या सर्व प्लॉटच्या नोंदी रद्द केल्या आहेत त्यामुळे जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार होत नाहीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुधारित प्रस्ताव शर्तभंग झालेल्या शेवटच्या दिवशीच्या रेडीरेकनर दराच्या 25 टक्के दराने दंडाची आकारणी करून ज्या ज्या तारखांना खरेदीपत्र झाली आहेत त्यानुसार त्यावेळच्या रेडिरेकनर दराप्रमाणे आकारणी करण्यात येणार आहे.
जुन्या शर्थीने अट कायमस्वरूपी काढून टाकून जमीन वर्ग दोन ऐवजी वर्ग एक करण्यात येणार आहे सदर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.नगरसेवक अर्जुन माने यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या पुढाकाराने हा विषय निकाली लागणार असून मंत्रालयापर्यंत केलेल्या पाठपुराव्याची माहिती सांगितली. समीर गायकवाड संग्राम फडतरे, प्रभाकर जाधव, राजाराम हाके,जालिंदर ढोले,आनंदा माने,बाबासो सोलांकर उपस्थित होते.
संपादन : प्रफुल्ल सुतार