तब्बल 400 वर्षांपूर्वीचा यल्लमा मंदिराजवळचा वटवृक्ष उन्मळून पडला; या वृक्षासाठी झाली आंदोलनं, ठाकरे-गडकरींनीही घेतली होती दखल

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना विनंती करत हा वृक्ष वाचविण्याचे आवाहन केले होते.
Banyan Tree Yellamma Temple
Banyan Tree Yellamma Templeesakal

सांगली : रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या (Ratnagiri-Nagpur Highway) कामादरम्यान भोसे (Yellamma Temple) यल्लमा मंदिरानजीकचा (ता. मिरज, जिल्हा सांगली) वृक्ष वाचविण्यासाठी जनआंदोलन झाले होते. या जनआंदोलनात 'सकाळ' आंदोलकांच्या साथीला होता. हा वृक्ष वाचविण्यात बातम्यांचे कव्हरेज सकाळने दिले होते.

दरम्यान, आंदोलनाची दखल घेत तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना विनंती करत हा वृक्ष वाचविण्याचे आवाहन केले होते. त्यांनीही प्रतिसाद देत हा वृक्ष (Banyan Tree) वाचविला.

मात्र, प्रशासनाकडून वृक्ष वाचवताना एका बाजूच्या फांद्या तोडल्या गेल्या. त्यामुळे वटवृक्ष, त्याच्या खालची जमीन थोडीशी ढिली झाली, वृक्षाचा बोजा एका बाजूला झाला. त्याचा परिणाम म्हणजे आज हा वृक्ष पावसाने उन्मळून पडला. त्याबरोबरच 400 वर्षाच्या इतिहासाचा साक्षीदार अखेर इतिहास जमा झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com