कवठेमहांकाळ तालुक्‍यात 42 गावांनी बसवला "एक गणपती' 

गोरख चव्हाण  
Monday, 24 August 2020

दिवसेंदिवस कोरोनाचे वाढते संकट रोखण्यासाठी प्रशासन खबरदारी घेत असताना दुसरीकडे गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर तालुक्‍यातील सर्वच गावानी प्रशासनाला सहकार्य केले आहे.

कवठेमहांकाळ  : दिवसेंदिवस कोरोनाचे वाढते संकट रोखण्यासाठी प्रशासन खबरदारी घेत असताना दुसरीकडे गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर तालुक्‍यातील सर्वच गावानी प्रशासनाला सहकार्य केले आहे. तालुक्‍यातील 42 गावांमध्ये एक गाव एक गणपती तर 16 गावात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. तालुक्‍यात यंदा सर्वच गावाने गणपती बाप्पाला कोरोनाचे संकट हद्दपार होऊ दे असे साकडे घातले असून प्रशासनाच्या हाकेला साथ दिली. 

तालुक्‍यामध्ये साठ गावांचा समावेश आहे. त्यापैकी सुमारे 42 गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात आली. 16 गावांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा गावातील गणेशोत्सव व ग्रामस्थाने निर्णय घेतला. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या दक्ष झाल्या आहेत. यंदा कोरोणाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला. तहसीलदार बी. जे. गोरे, गटविकास अधिकारी रवींद्र कणसे, पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दत्तात्रय पाटील, मुख्याधिकारी डॉ. संतोष मोरे यांच्या नेतृत्वाखालील समितीने गावोगावी असलेल्या समित्यांना प्रशासनाने एक गाव एक गणपती राबवा असे आवाहन केले होते. आवाहनाला तालुक्‍यातील सुमारे 42 गावाने साथ दिली.

दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.गावोगावी अनेक मंडळी गणेशोत्सव साजरा करत होते मात्र यंदा कोरोणाच्या संकटामुळे ग्रामस्थानी एक गाव एक गणपती संकल्पना राबवली.16 गावात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल कोलंबीकर,पोलीस उपनिरीक्षक अक्षय ठिकणे, दिपाली गायकवाड यांनी गावोगावी गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत एक गाव एक गणपती संकल्पना राबवावी असे आवाहन केले होते आवाहनाला तलुक्‍यातील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी पुढाकार घेत सहकार्य केले. 

संकल्पना राबवणारी गावे 
वाघोली, हरोली, मळणगाव,सराटी, ढालगाव, अग्रण धुळगाव,घाटनांद्रे,दुधेभावी,ढोलेवाडी तिसंगी,जाखापूर,कुंडलापूर,गरजेवाडी, केरेवाडी,आरेवाडी,चोरोची,जांभूळवाडी, ढालेवाडी,मोघमवाडी, बसापाचीवाडी, ईरळी,घोरपडी, शिंदेवाडी (हिंगणगाव), नागज,जायगव्हान, पिंपळवाडी, थबडेवाडी, शेळकेवाडी,मोरगाव जाधववाडी, लोणारवाडी,शिंदेवाडी (घोरपडी), विठूरायाचीवाडी, चुडेखिंडी नरसिंहगाव, कदमवाडी,लंगरपेठ,निमज,नांगोळे, रामपुरवाडी व करलहट्टी. 

गणेशोत्सव न करणारी गावे : 
खरशिंग,देशिंग, बनेवाडी,कुकटोळी,कुची, आगळगाव,बोरगाव,अलकुड(एम), शिरढोण,रायवाडी,अलकुड (एस),झुरेवाडी, हिंगणगाव,कोकळे,करोली(टी),म्हैसाळ (एम). 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 42 villages established "Ek Ganpati"