
सांगली ः जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढ सुरूच आहे. रविवार (ता. 28) व सोमवार (ता. 29) या दोन दिवसांत 439 रुग्णांची भर पडली; तर सात जणांचा मृत्यू झाला. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 134 आहे. अद्यापही 156 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. कोरोना चाचण्यांची संख्या दोन्ही दिवसांत दोन हजार रुग्णांच्या आसपासच आहे.
जिल्ह्यात कोरोनाची वाढती संख्या कायम आहे. गेल्या दोन दिवसांत कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 439 ने वाढली आहे. त्यात रविवारी 224, तर सोमावरी 205 रुग्णांचा समावेश आहे. "आरटीपीसीआर'च्या रविवारी केलेल्या 1284 चाचण्यांमध्ये 184 जण; तर आजच्या 1125 मध्ये 145 जण पॉझिटिव्ह आढळले. तसेच अँटिजेनच्या रविवारी केलेल्या 865 चाचण्यांमध्ये 71 आणि आजच्या 724 मध्ये 59 जण पॉझिटिव्ह सापडले. रविवारी तिघांचा मृत्यू झाला. त्यात महापालिका, मिरज व वाळव्यातील एकाचा समावेश आहे; तर आज चौघांचा मृत्यू झाला. त्यात आटपाडी, मिरज, वाळवा व पलूस तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. जिल्ह्यात चिंताजनक रुग्णांची संख्या 156 आहे.
जिल्ह्यात सोमवारी सर्वाधिक रुग्ण महापालिका हद्दीत 46, वाळवा तालुक्यात 32, जत, तासगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्यात प्रत्येकी 26 रुग्ण सापडले. आटपाडी, मिरज तालुक्यात प्रत्येकी 11, कवठेमहांकाळ 2 आणि शिराळा तालुक्यातील 6 जणांचा समावेश आहे.
जिल्ह्यात सध्या उपचाराखालील 1914 रुग्ण आहेत. आजअखेर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 47 हजार 486 असून, मृतांची संख्या 1792 आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 51 हजार 192 इतकी झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 25 हजार 990 जण, शहरी भागातील 7 हजार 534; तर सांगली, मिरज, कुपवाड मनपा भागातील 17 हजार 568 रुग्णांचा समावेश आहे.
तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या (सोमवार अखेर)
संपादन : युवराज यादव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.