या जिल्ह्यात उडणार पुन्हा एकदा निवडणुकीचा धुरळा

450 gram panchayat election program ready in sangli district
450 gram panchayat election program ready in sangli district

पेड (सांगली) :  ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणूक ही महत्त्वपूर्ण आणि प्रतिष्ठेची मानली जाते. त्यात सरपंच पदाची प्रतिष्ठा आणि गावातील प्रथम नागरिक म्हणून सरपंचाकडे पाहिले जाते. यावेळी आघाडी सरकारने आधीच्या महायुतीच्या थेट सरपंच निवडीचा निर्णय रद्द करीत सदस्यांमधूनच सरपंच निवडीचा निर्णय घेतला आहे. येत्या सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिन्यात निम्मा जिल्हा निवडणूकमय होणार आहे. तब्बल साडेचारशेंवर गावात निवडणुकीचे मैदान रंगणार आहे. त्यामुळे विधनसभा निवणुकीनंतर पुन्हा एकदा गावे राजकारणाच्या धुरळ्यात रंगणार आहेत. 

ग्रामस्थआना विशेषता तरुणांना निवडणुकीचे विविध लागल्याचे चित्र पेड परिसरातील पेड, मांजर्डे, हातनूर यासह अन्य गावात पहावयास मिळत आहे. त्यात सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीवर सर्वांचे लक्ष लागले असून त्यासाठी आजी-माजी दिग्गज तसेच तरुणांनी आत्तापासूनच निवडणुकीसाठी कंबर कसली असून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वच उमेदवारांनी आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केली असून ' मी पुन्हा येईन ' त्यानुसार मैदानात उतरणार आहेत. तरुणांनी सदस्य-सरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. सारे तयारीला झटून लागले आहेत.   ग्रामपंचायत विकासाच्या केंद्रस्थानी असली तरी आता ते राजकारणाचाही केंद्रबिंदू आहे. गावातील मूलभूत सुविधा ग्रामपंचायत मार्फत पूर्ण होत असल्याने सुशिक्षित तरुणांचा कल स्थानिक निवडणुकीकडे आकर्षित झाल्याचे दिसून येत आहे. राज्य शासनाकडून ग्रामपंचायतींना थेट निधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र बहुसंख्य ग्रामपंचायतीनी याचा मूलभूत सुविधांसाठी चांगला उपयोग केल्याचे मात्र दिसलेले नाही. सध्या शासनाकडून ग्रामपंचायतींना विकास कामासाठी थेट निधी मिळत असल्याने या कामात मोठ्या प्रमाणात घोटाळे होत असून तसेच कामांचा दर्जा खालावलेला असल्याचं घटना अनेक ठिकाणी पहावयास मिळालेले आहेत. तरीही शिक्षित तरुणांचा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सहभाग वाढला आहे.  तरुणांचा राजकारणात विकास कामासाठीचा वाढता सहभाग पाहता ग्रामीण भागातील लहान मोठ्या गावांच्या प्रगतीत भर पडणार असल्याची चर्चा नागरिक करताना दिसत आहेत. कोणत्या प्रभागात कोण निवडून येऊ शकतो, कोणाचा संपर्क चांगला आहे, तसेच कोणाची आर्थिक स्थिती मजबूत आहे याचे भाकीत तसेच वार्ड निहाय मतदार याद्या, बाहेरगावी असणारे मतदार, नातेवाईक, मित्रमंडळी, निवडून येण्यासाठी किती मते आवश्‍यक आहेत. या बारीक-सारीक बाबींचा अभ्यास करताना व्यस्त असल्याचे पाहावयास मिळत आहे. म्हणजेच यंदाच्या निवडणुकीत ग्रामपंचायतीमध्ये काट्याची लढत होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

थेट सरपंच निवडीला फाटा
सरपंच पदाची निवड सदस्यातुन होणार आहे.  महा विकास आघाडी सरकारने सरपंचाची निवड थेट जनतेतून रद्द करणारे विधेयक विधिमंडळात मंजूर केले आहे. थेट निवडीने भाजपला गावागावात पोहचण्याची संधी मिळाली. गावगाड्यातील प्रस्थापितांना धक्का बसला. त्यामुळे आघाडी सत्तेत येताच हा निणर्य बदलण्यात आला.  यापुढे सरपंच पदासाठी थेट निवडणूक न होता ग्रामपंचायत सदस्यच त्याची बहुमताने निवड करणार आहेत.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com