जतमध्ये गोडाऊन फोडून 450 किलो तांदूळ चोरला

बादल सर्जे 
Tuesday, 6 October 2020

जत ते अचकनहळ्ळी रोडवर असलेले शासकीय धान्याचे गोडाऊन फोडून 450 किलो तांदूळ व 250 किलो मका अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला.

जत : जत ते अचकनहळ्ळी रोडवर असलेले शासकीय धान्याचे गोडाऊन फोडून 450 किलो तांदूळ व 250 किलो मका अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. त्याची शासकीय किंमत 1 हजार 850 इतकी असून बाजार भावानुसार तांदळाची 13 हजार 500 तर मक्‍याची 3500 रूपये इतकी किंमत होते. याबाबत जत पोलीस ठाण्यात गोडाऊन किपर इस्माईल शेख यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री 9 वाजता गोडाऊन बंद करून कामगारासह गोडाऊन किपर बाहेर पडले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनच्या मागील बाजूचे शटर कटावणीने उचकटून आत प्रवेश केला. याठिकाणी असलेले तांदळाचे साडे चार क्वींटलची पोती व अडीच क्वींटलचा मका, अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला.

दरम्यान, गोडाऊनच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलिस याचा तपास करीत आहेत. या घटनेनंतर जिल्हा पुरवठा अधिकारी बर्वे व जतचे प्रांताधिकारी प्रशांत आवटे, तहसीलदार सचिन पाटील यांनी भेट दिली.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 450 kg of rice was stolen from a godown in Jat