शिराळा तालुक्‍यात 47 गावांना मिळणार महिला सरपंच

शिवाजी चौगुले
Saturday, 30 January 2021

शिराळा : तालुक्‍यातील 91 गावांच्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले असून, यात 47 ठिकाणी महिलांना संधी मिळाली असल्याने तालुक्‍यात महिलाराज येणार आहे.

शिराळा : तालुक्‍यातील 91 गावांच्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले असून, यात 47 ठिकाणी महिलांना संधी मिळाली असल्याने तालुक्‍यात महिलाराज येणार आहे. अनेक गावांत महिला आरक्षण पडल्याने इच्छुकांच्या भावी सरपंच होण्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला. येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोडत पार पडली.
 
या वेळी प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार आरुषी सिंग, तहसीलदार गणेश शिंदे, नायब तहसीलदार ए. डी. कोकाटे, व्ही. डी. महाजन उपस्थित होते. गावनिहाय आरक्षण असे ः अनुसूचित जाती- पाडळीवाडी कांदे, शिरगाव, मांगरूळ. अनुसूचित जाती स्त्री- कणदूर, पाडळी, खेड, रांजणवाडी, करुंगली. नागरिकांचा मागास प्रवर्ग- इंगरुळ, बांबवडे, वाडीभागाई, अंत्री खुर्द, नाटोली, वाकुर्डे बुद्रुक, फकीरवाडी, मांगले, अस्वलेवाडी, हत्तेगाव, चिखलवाडी, ढोलेवाडी. नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री- चिखली, कापरी, काळुंद्रे, कुसळेवाडी, भैरेवाडी, खराळे, धामवडे, वाकुर्डे खुर्द, मोहरे, कदमवाडी, तडवळे, बिळाशी, चिंचेवाडी. 

सर्वसाधारण- पुनवत, मानेवाडी, देववाडी, औंढी, गिरजवडे करमाळे, पाचुंब्री, प. त. वारुण, धसवाडी, प. त. शिराळा, शिवरवाडी, कोंडिईवाडी, रिळे, शिरसटवाडी, येळापूर, शिंदेवाडी, उपवळे, जांभळेवाडी, खिरवडे, पावलेवाडी, आंबेवाडी, रेड, निगडी, किनरेवाडी, घागरेवाडी, शेडगेवाडी, सावंतवाडी, खुजगाव. 

सर्वसाधारण स्त्री - बेलदारवाडी, गुढे, शिरसी, कोकरूड, मणदूर, वाकाईवाडी, लादेवाडी, शिराळे खुर्द, फुफिरे, गवळेवाडी, मराठेवाडी, सागाव, पाचगणी, बिऊर, मादळगाव, टाकवे, चरण, अंत्री बुद्रुक, माळेवाडी, मेणी, मोरेवाडी, सोनवडे, भटवाडी, कुसाईवाडी, आरळा, खुंदलापूर, नाठवडे, बेलेवाडी, चिंचोली. 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 47 villages in Shirala taluka will get women sarpanch