esakal | जिल्ह्यात नवे 487 रुग्ण; 241 कोरोनामुक्त ; 5 मृत्यू 

बोलून बातमी शोधा

487 new patients in the district; 241 coronal free; 5 deaths

जिल्ह्यात आज दिवसभरात झालेल्या आरटीपीसीआर आणि ऍन्टीजेन चाचण्यांत 487 कोरोना बाधित आढळले. त्यापैकी सर्वाधिक रूग्ण पालिका क्षेत्रात आढळून आले आहे. दिवसभरात 163 जणांना बाधा झाली. दिवसभरात 241 जण कोरोनामुक्त झाले. तर आज पाचजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

जिल्ह्यात नवे 487 रुग्ण; 241 कोरोनामुक्त ; 5 मृत्यू 
sakal_logo
By
घनशाम नवाथे

सांगली  : जिल्ह्यात आज दिवसभरात झालेल्या आरटीपीसीआर आणि ऍन्टीजेन चाचण्यांत 487 कोरोना बाधित आढळले. त्यापैकी सर्वाधिक रूग्ण पालिका क्षेत्रात आढळून आले आहे. दिवसभरात 163 जणांना बाधा झाली. दिवसभरात 241 जण कोरोनामुक्त झाले. तर आज पाचजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

जिल्ह्यात मार्चपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. दररोजच्या रुग्णसंख्येने चारशेपर्यंतचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे नागरिकांत पुन्हा कोरोनाची भीती पसरली आहे. जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचीच स्थिती आहे. त्यामुळे प्रशासन व आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीत 1942 जणांचे स्वॅब तपासले. त्यात 307 जण कोरोना बाधित आढळले. ऍन्टीजेन चाचणीत 1183 जणांचे स्वॅब तपासले. त्यात 200 जण बाधित आढळले. दोन्ही चाचण्यांत 507 जण बाधित आढळले. त्यापैकी 487 जण जिल्ह्यातील असून 13 जण परजिल्ह्यातील आहेत. 

आज खानापूर तालुक्‍यात सर्वाधिक 66, मिरज तालुक्‍यात 61 रुग्ण आढळले. आटपाडी तालुका 9, जत तालुका 15, कडेगाव 43, कवठेमहांकाळ 9, पलूस 14, शिराळा 14, तासगाव 39, वाळवा 54 याप्रमाणे रुग्ण आढळले. तर महापालिका क्षेत्रात 163 रुग्ण आढळले. त्यापैकी 112 सांगलीतील व 51 मिरजेतील आहेत. 

जिल्ह्यात आज दिवसभरात 241 जण कोरोनामुक्त झाले. तर 5 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी दोघे सांगली आणि मिरजेतील, दोन वाळवा तालुक्‍यातील, तर एक कडेगाव तालुक्‍यातील रुग्ण आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या 3806 रुग्णांपैकी 578 जण चिंताजनक आहेत. त्यापैकी 480 जण ऑक्‍सिजनवर आणि 49 जण व्हेंटीलेटरवर आहेत. 

आज कोल्हापूरमधील सहा, सोलापूरमधील दोन, सातारा येथील सहा, पुण्यातील एक, ठाणे येथील एक, राजस्थानातील एक, कर्नाटकातील एक, हरियाणातील एक आणि आंध्रप्रदेश येथील एक रुग्ण असे वीस रूग्ण उपचारासाठी दाखल झाले. परराज्य आणि जिल्ह्यातील 134 जणांवर सध्या उपचार सुरू असून आजपर्यंत 1829 जणांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी 220 जणांना उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर 1475 जण कोरोनामुक्त झाले. 

जिल्ह्यातील चित्र- 
आजअखेर बाधित रुग्ण- 55554 
आजअखेर कोरोनामुक्त- 49902 
आजअखेर मृत रुग्ण- 1846 
परजिल्ह्यातील मृत- 220 
ग्रामीण रुग्ण- 28376 
शहरी रुग्ण- 8364 
महापालिका क्षेत्र- 18814 
 

संपादन : प्रफुल्ल सुतार