जिल्ह्यात नवे 497 रूग्ण : 685 कोरोनामुक्त...11 जणांचा मृत्यू

घनश्‍याम नवाथे
Friday, 2 October 2020

सांगली-  जिल्ह्यात आज दिवसभरात झालेल्या कोरोना निदान चाचणीमध्ये 497 नवे रूग्ण आढळले. त्यामध्ये महापालिका क्षेत्रातील 113, ग्रामीण भागातील 324 आणि शहरी भागातील 60 रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात 685 रूग्ण कोरोनामुक्त झाले. तर आज जिल्ह्यातील 11 जणांचा मृत्यू झाला. 

सांगली-  जिल्ह्यात आज दिवसभरात झालेल्या कोरोना निदान चाचणीमध्ये 497 नवे रूग्ण आढळले. त्यामध्ये महापालिका क्षेत्रातील 113, ग्रामीण भागातील 324 आणि शहरी भागातील 60 रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात 685 रूग्ण कोरोनामुक्त झाले. तर आज जिल्ह्यातील 11 जणांचा मृत्यू झाला. 

जिल्ह्यात पाच-सहा दिवसापासून कोरोना बाधित रूग्णांची संख्या कमी होतानाचे चित्र दिसत असून त्यामुळे थोडासा दिलासा मिळत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचणीत 1024 रूग्ण तपासले. त्यामध्ये 207 जण कोरोना बाधित आढळले. हे प्रमाण 20 टक्के इतके आहे. तसेच आज ऍन्टीजेन चाचणीत 2038 रूग्ण तपासले असता त्यामध्ये 293 जण बाधित आढळले. हे प्रमाण 14 टक्के इतके आहे.

दिवसभरात दोन्ही चाचणीत एकुण 500 जण बाधित आढळले. त्यापैकी 497 जिल्ह्यातील असून उर्वरीत तिघेजण कोल्हापूर, मुंबई व पुणे येथील आहेत. तसेच 497 पैकी 113 महापालिका क्षेत्रातील असून त्यामध्ये सांगलीतील 65 आणि मिरजेतील 48 आहेत. तसेच ग्रामीण भागात आटपाडी तालुक्‍यात 25, जत 17, कडेगाव 50, कवठेमहांकाळ 23, खानापूर 47, मिरज 56, पलूस 15, शिराळा 16, तासगाव 49, वाळवा 86 याप्रमाणे रूग्ण आढळले. 
आज दिवसभरात 11 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये आटपाडी, जत, मिरज, शिराळा, तासगाव तालुक्‍यातील प्रत्येकी एक, वाळवा तालुक्‍यातील तीन आणि महापालिका क्षेत्रातील तीन रूग्णांचा समावेश आहे. सद्यस्थितीत 922 रूग्ण चिंताजनक आहेत. त्यापैकी 815 जण ऑक्‍सिजनवर असून 107 जण व्हेंटीलेटरवर आहेत. आज दिवसभरात 685 जण कोरोनामुक्त झाले. 

जिल्ह्यातील चित्र 

  • आजअखेर जिल्ह्यातील रूग्ण- 38125 
  • सध्या उपचार घेणारे रूग्ण- 6924 
  • आजअखेर बरे झालेले रूग्ण- 29817 
  • आजअखेर जिल्ह्यातील मृत- 1384 
  • आजअखेर परजिल्ह्यातील मृत- 180 
  • पॉझिटीव्हपैकी चिंताजनक रूग्ण- 922 
  • आजअखेर ग्रामीण रूग्ण- 17529 
  • आजअखेर शहरी रूग्ण- 5712 
  • महापालिका क्षेत्रातील रूग्ण- 14884 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 497 new patients in the district: 685 corona free