सांगलीत कोरोनाचे 5 रुग्ण; 11 जण कोरोनामुक्त 

शैलेश पेटकर 
Monday, 1 February 2021

जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे केवळ पाच जणांना बाधा झाल्याचे सकारात्मक चित्र आहे. महापालिका क्षेत्रातील दोघांचा त्यात समावेश आहे. 11 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

सांगली : जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे केवळ पाच जणांना बाधा झाल्याचे सकारात्मक चित्र आहे. महापालिका क्षेत्रातील दोघांचा त्यात समावेश आहे. 11 जण कोरोनामुक्त झाले आहेत. बाधितांची संख्या 48 हजार 97 झाली. आज 140 जणांची आरटीपीसीआर तपासणी झाली. त्यात एक बाधित आढळला. 244 जणांची अँटीजेन तपासणी करण्यात आली. त्यात चार जण बाधित आढळले. आटपाडी, जत, कडेगाव तालुक्‍यातील प्रत्येकी एकास बाधा झाली. महापालिका क्षेत्रातील सांगलीतील दोघांना बाधा झाली. 

परजिल्ह्यातील रुग्णही उपचारासाठी दाखल करण्यात येतात. एकूण बाधितांची संख्या 1547 इतकी आहे. त्यापैकी 1319 रुग्ण बरे झाले आहेत. गृहअलगीकरणात 70 रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णालयात 60 जण उपचार घेत आहेत. 

सध्याची स्थिती अशी ः आजचे बाधित ः 5, उपचाराखाली ः 130, बरे झालेले ः 46 हजार 218, मृत्यू ः 1749, बाधित ः 48 हजार 097, चिंताजनक 36, ग्रामीण बाधित ः 24 हजार 339, शहरी बाधित ः 7 हजार 180, मनपा क्षेत्रात बाधित 16 हजार 578. 

संख्या 48 हजार 97 :

जिल्ह्यात आज 5 रुग्ण कोरोनाबाधित झाले. एकूण रुग्णांची संख्या 48 हजार 97 झाली. 
आटपाडी : 2489 
जत : 2275 
कडेगाव : 2949 
कवठेमहांकाळ : 2471 
खानापूर : 2967 
मिरज : 4543 
पलूस : 2629 
शिराळा : 2293 
तासगाव : 3410 
वाळवा : 5493 
महापालिका : 16578 
एकूण 48 हजार 097

 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 patients of Sangli Corona; 11 corona free