नातीचा वाढदिवस साजरा करुन परतताना काळाचा घाला! तासगाव-मणेराजुरी मार्गावर कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील 6 जण ठार

या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. हे सर्व पाच जण तासगाव (Tasgaon) शहरातील असल्याचे समजते.
Takari Canal on Tasgaon-Manerajuri Road
Takari Canal on Tasgaon-Manerajuri Roadesakal
Summary

कोकळे येथील एक वाढदिवस कार्यक्रम आटोपून तासगावकडे माघारी येताना काळाने त्यांच्या कुटुंबावर घाला घातला असून एक मुलगी गंभीर जखमी आहे.

तासगाव : नातीचा वाढदिवसाचा कार्यक्रम संपवून गाडीतून तासगावकडे (Tasgaon Accident) येत असताना आजोबांचा गाडीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात सहा जण जागीच ठार, तर एक महिला जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. मृतांमध्ये एका सहा महिन्याच्या बालिकेसह तीन लहान मुलांचा समावेश आहे.

सर्व अपघाग्रस्त तासगाव बुधगाव आणि कोकळे येथील आहेत. अपघाताचा प्रकार पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, तासगाव येथील व्यवसायाने इंजिनियर असलेले राजेंद्र जगन्नाथ पाटील (वय ६०) हे कोकळे तालुका कवठेमंहकाळ येथे आपल्या सानवी या नातीच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त गेले होते.

वाढदिवस साजरा करुन परतताना काळाचा घाला

तेथून कार्यक्रम आटोपून मोटारीने अकरा वाजता परत तासगाव कडे येत असताना, तासगाव मनेराजुरी रस्त्यावर तासगाव पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मोकळ्या ताकारी कालव्यात (Takari Canal) कोसळून गाडीतील चालक असलेले राजेंद्र जगन्नाथ पाटील, त्यांच्या पत्नी सुजाता जगन्नाथ पाटील वय ५५, मुलगी प्रियांका अवधूत खराडे वय ३३ रा. बुधगाव ता. मिरज, नात ध्रुवा अवधूत खराडे वय ४ वर्षे, कार्तिकी अवधूत खराडे वय ६ महिने, सानवी विकास भोसले वय २ वर्षे रा. कोकळे ता. कवठेमहांकाळ हे सहा जण जागीच ठार झाले तर स्वप्नाली विकास भोसले वय ३० वर्षे रा. कोकळे ही महिला गंभीर जखमी झाली.

Takari Canal on Tasgaon-Manerajuri Road
Dombivli MIDC Blast : सात दिवस उलटूनही जोंधळेंचा मृतदेह सापडला नसल्याने पत्नी हवालदिल; प्रशासनाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर

अपघात रात्री एक वाजण्याच्या सुमारास झाला असला तरी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास फिरायला जाणाऱ्या काही जणांच्या कानावर जखमी स्वप्नाली भोसले यांचा आवाज आल्यानंतर अपघात झाल्याचे लक्षात आले. तातडीने आजूबाजूच्या नागरिकांनी एकत्र येऊन जखमी स्वप्नाली भोसले यांना गाडी बाहेर काढले. पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर तासगाव पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी स्वप्नाली भोसले यांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती समजताच ग्रामीण रुग्णालयात नातेवाईक आणि तासगावातील नागरिकांनी गर्दी केली होती. दुपारी दोन वाजता तासगाव ग्रामीण रुग्णालय (Tasgaon Rural Hospital) येथे उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com