
सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सातत्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. चोवीस तासात जिल्ह्यातील आणखी सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. जिल्हा पुन्हा हाय अलर्टच्या दिशेने निघाला आहे. आटपाडी तालुक्यातील आणखी चार जणांना कोरोना झाला. तर शिराळा तालुक्यात दोन आणि जत तालुक्यात एक असे सात रुग्ण वाढले आहे. सध्यस्थितीत 33 रुग्णांवर कोरोना रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
आटपाडी हादरली; चार नवे रुग्ण
आटपाडी ः तालुक्यात आज सोनारसिद्ध नगर येथे दोन, पिंपरी खुर्दला एक आणि आटपाडीत एक असे चार नवीन कोरोणा रुग्णांची भर पडली. आटपाडी तालुक्यात एकूण सात रुग्ण झाले आहेत. पिंपरी खुर्द आणि सोनारसिद्ध नगर येथील सापडलेले रुग्ण बऱ्यापैकी अनेकांच्या संपर्कात आले आहेत. त्यामुळे या भागात मोठी खळबळ उडाली आहे.
पिंपरी खुर्द येथे 17 मे रोजी मुंबईतून सहा जणांचे कुटुंब गावी आले होते. यामध्ये वडील आणि त्यांची दोन मुले, पत्नी आणि सुना असा हा परिवार आहे. त्यांना होम क्वारंटाइन केले होते. यातील एकाला त्रास होऊ लागल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात तो उपचारासाठी गेला होता. प्राथमिक लक्षणे दिसल्यामुळे त्याला तातडीने तपासणीसाठी मिरजेला पाठवले. या तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याच्या संपूर्ण कुटुंबाला तपासणीसाठी रात्रीत हलवले.
सोनारसिद्ध नगर येथेही मुंबईवरून दोन तरुणी आल्या होत्या. त्यांनाही होम क्वारंटाइन केले होते. मात्र त्या अनेकांच्या संपर्कात आल्या आहेत. बिनधास्तपणे वावरत होत्या. त्यांनाही त्रास होऊ लागल्यामुळे आरोग्य विभागाने तपासणीसाठी मिरजेला पाठवले होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याच्या बातमीने सोनारसिद्ध नगर आणि परिसर हादरून गेला आहे. आटपाडी शहरात चावडीच्या परिसरात एकजण बाहेरून आला होता. त्यालाही क्वारंटाइन करण्यात आले होते. त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज नवीन चार रुग्ण सापडले असून तालुक्यात तीन दिवसात एकूण सात रुग्ण झाले आहेत. या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
रेड, मोहरे गावात रुग्ण
शिराळा : रेड (ता.शिराळा) येथील मुंबईहून आलेल्या कुटुंबाच्या संपर्कातील आणखी एका वीस वर्षीय तरुणास कोरोना लागणी झाली आहे. त्यामुळे रेड येथे कोरोनाबाधितांची संख्या तीन झाली आहे. याचबरोबर मोहरे (ता. शिराळा) येथे मुंबईहुन आलेल्या एकास कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल रात्री उशीरा आला. त्यामुळे शिराळा तालुक्यात रुग्णांची संख्या सहा झाली आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील यांनी दिली. दरम्यान, पश्चिम शिराळा भागात मुंबईला असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. एक रुग्ण वाढल्याने कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
रेड येथे चौघांचे कुटुंब मुंबईहुन 17 मे रोजी आले होते. त्यांना जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाइन करण्यात आले. सोमवारी पती-पत्नीला ताप आल्याने व घशात दुखत असल्याने मिरज येथे पाठवले होते. त्यांची चाचणी केली असता महिलेचा अहवाल काल पॉझिटिव्ह आला. पतीचा अहवालही पॉझिटिव्ह आला. त्यांच्या संपर्कातील वीस वर्षीय तरुणास आज लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यापाठोपाठ मोहरे (ता. शिराळा) येथे एकास कोरोनाची लागण झाली आहे. पश्चिम भागात कोरोनाचा शिरकाव नव्हता. आता शिरकाव झाला आहे. शिराळा तालुक्यातील बाहेरून येणाऱ्या लोकांचा ओघ वाढला आहे. आत्तापर्यंत 4 हजार 411 लोकांना होम व इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करण्यात आले.
वाळेखिंडीतील एकास कोरोनाची लागण
जत ः वाळेखिंडी (ता. जत) येथे आज 52 वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल रात्री प्राप्त झाला. मुंबईहुने 17 मे रोजी गावी आला होता. त्यावेळी त्या व्यक्तीस इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले होते. जत तालुक्यातील हा तिसरा रुग्ण असल्याने हादरला आहे. वाळेखिंडी गाव रात्री उशीरा सील करण्यात आले होते.
जत तालुक्यात यापूर्वी अंकले (ता. जत) मुंबईतून चौघेजण झाले होते. त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करण्यात आले होते. आठवड्यापूर्वी त्यातील एकास कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील आणखी एका व्यक्तीस कोरोनाची लागण झाली. उर्वरित दोघे निगेटिव्ह आले होते. जत तालुक्यात दोन रुग्ण झाल्याने हादरला होता. आठवड्यातच तालुक्यातील वाळेखिंडे येथील एकास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाला.
ही व्यक्ती 17 मे रोजी मुंबईहुन मूळ गावी आली होती. त्यावेळी त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करण्यात आले होते. आज त्रास जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी मिरजेतील कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठिवण्यात आले. रात्री उशीरा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर गाव सील करण्यात आले असून कंटेन्मेट आणि बफर झोन करण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.