यंदा "लालपरी' चा वाढदिवस सुनासुनाच...कोरोनाचे सावट

st bus.png
st bus.png
Updated on

सांगली- "प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीदवाक्‍य घेऊन अखंडपणे वाड्यावस्त्यावर आणि दुर्गम भागात धावणाऱ्या एसटीचा आज 72 वा वर्धापनदिन सुनासुनाच गेला. "लालपरी' च्या वर्धापनदिनावर "कोरोना' सावट असल्यामुळे केक कापला गेला नाही की आनंदोत्सव साजरा केला नाही. मात्र सोशल मिडियावर "पोस्ट' टाकून लालपरीला अनेकांनी शुभेच्छा दिल्या. 


माणसाच्या अन्न-वस्त्र-निवारा या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी एसटी अखंडपणे 72 वर्षे धावत आहे. एसटीमुळेच अनेकांना शिक्षण घेता आले. सध्या मुलभूत गरजामध्ये शिक्षणाची भर पडली असून एसटीमुळेच अनेकांची ही गरज पूर्ण झाली आहे. आज देखील एसटीमुळे ग्रामीण भागातील मुलांना शहरी भागात येऊन शिक्षण घेता येते ही वस्तुस्थिती आहे. तसेच नोकरी आणि कामधंद्यासाठी अनेकांचे हक्काचे वाहन "एसटी' च आहे. त्यामुळेच तर "वाट पाहीन, पण एसटीनेच जाईन' असे ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवासी हक्काने सांगतात. त्यामुळे एसटी म्हणजे अनेकांची जीवनवाहिनीच ठरली आहे. 


एक जून म्हणजे एसटीचा वर्धापनदिन म्हणून प्रतिवर्षी साजरा केला जातो. वेगवेगळ्या आगारात एसटी बसेस सजवून केक कापला जातो. प्रवाशांचे उत्साहात स्वागत केले जाते. काही ठिकाणी आगारात सजावट केली जाते. परंतू यंदा "लालपरी' च्या वाढदिवसावर कोरोनाचे सावट आले आहे. एसटी महामंडळ प्रशासनाने आपत्तीमुळे वाढदिवस साजरा करू नका अशा सूचना दिल्या आहेत. त्याचे आज सर्वत्र पालन केल्याचे दिसून आले. मात्र अनेकांनी सोशल मिडियावरून "लालपरी' ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 
 

तोट्यात धावतेच आहे... 
कोरोनामुळे एसटीचे सांगली विभागाचे जवळपास 60 कोटीचे नुकसान झाले आहे. तरीही प्रवाशांच्या सेवेसाठी दरवाढ न करता जुन्या दरातच तोटा सहन करून क्षमतेपेक्षा निम्मेच प्रवासी घेऊन एसटी धावते. तोटा भरून काढण्यासाठी मालवाहतूकीसाठी देखील एसटी धावत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Government Hospital Accident
Sangli Ganesh Visarjan
Who is Yuvraj Adityaraje Patwardhan?
Vasumbe Road Accident Father And Son Killed In Two Wheeler Crash Mother Seriously Injured After Tempo Collision
Marathi News Esakal
www.esakal.com