सांगली जिल्ह्यासाठी 74 व्हेंटिलेटर आले....या ठिकाणी केले वाटप 

घनश्‍याम नवाथे
Sunday, 6 September 2020

सांगली- जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गंभीर रूग्णांच्या उपचारासाठी व्हेंटिलेटरची कमतरता पडत होती. आता जिल्ह्याकरिता शासनाकडून तसेच इतर विविध ठिकाणाहून एकूण 74 व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत. ग्रामीण भागातील रूग्णांना त्यांच्या तालुक्‍याच्या ठिकाणीच उपचार मिळावेत याकरिता काही व्हेंटिलेटरचे ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये, डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल यांना वाटप केले आहे. यामुळे शहरी भागातील रूग्णांबरोबरच ग्रामीण भागातील रूग्णांनाही दिलासा मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. 

सांगली जिल्ह्यासाठी शल्य चिकित्सक ठाणे व धुळे यांच्याकडून प्रत्येकी 10 तर वर्धा यांच्याकडून 15 व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत. महानगरपालिका मुंबई यांच्याकडून 10, पीएम केअर मधून 25, नारायण हॉस्पीटल बेंगलुरू यांच्याकडून 1 असे 71 तर टाटा ट्रस्टकडून उपजिल्हा रूग्णालय इस्लामपूर साठी 3 असे एकूण 74 व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत.

या व्हेंटिलेटरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे 6, विवेकानंद हॉस्पीटल 1, श्रीसेवा हॉस्पीटल आटपाडी 2, प्रकाश मेमोरिअल क्‍लिनीक इस्लामपूर 2, उमा अरळी हॉस्पीटल जत 2, श्रीसेवा हॉस्पीटल आटपाडी 4, उपजिल्हा रूग्णालय कवठेमहांकाळ 3, मेहत्रे हॉस्पीटल कवठेमहांकाळ 2, उपजिल्हा रूग्णालय शिराळा 4, श्री हॉस्पीटल विटा 2, ओम श्री हॉस्पीटल विटा 2, सदगुरू हॉस्पीटल विटा 1, मयुरेश्वर हॉस्पीटल जत 2, सांगलुरकर हॉस्पीटल इस्लामपूर 2, कोविड सेंटर क्रिडा संकुल मिरज 5, दुधणकर हॉस्पीटल कुपवाड 1, उपजिल्हा रूग्णालय इस्लामपूर 3, ग्रामीण रूग्णालय विटा 3, ग्रामीण रूग्णालय जत 2, भारती हॉस्पीटल 5, घाडगे हॉस्पीटल 5, कुल्लोळी हॉस्पीटल 5, विवेकानंद हास्पीटल 3, वानलेस हॉस्पीटल मिरज 4 असे वाटप केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 74 ventilators came for Sangli district