कोयना धरणात 80 टीएमसी साठा, धरण 88 टक्के भरले 

विष्णू मोहिते
Friday, 14 August 2020

चांदोली धरणात 30.04 टी. एम. सी. पाणीसाठा झालेला असून विसर्ग पुन्हा वाढवण्यात आला आहे.

सांगली : जिल्ह्याच्या पश्‍चिम व मध्य भागात पावसाची रिमझिम सुरु होती. चांदोली धरणात 30.04 टी. एम. सी. पाणीसाठा झालेला असून विसर्ग पुन्हा वाढवण्यात आला आहे. सायंकाळी 7 हजार 211 क्‍युसेकने विसर्ग सुरु झाल्याने पाणीपातळी वाढत आहे. कोयना धरणात आज 80 टीएमसी हून अधिक साठा झालेला आहे. 

कोयना धरण परिसरात 46 मिलिमिटर पाऊस झाला. नवजाला 45 तर महाबळेश्‍वरला 69 मिलिमिटर पाऊस पडला. कोयनेत 83 टी. एम. सी. पाणीसाठा झाल्यानंतर पाण्याचा विसर्ग सुरु केला जावू शकतो. मात्र सध्यातरी पावसाचा जोर कमी असल्याने काळजीसारखी परस्थिती नाही. जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 3.29 मिलिमिटर पाऊस पडला. शिराळा तालुक्‍यात सर्वाधिक 14.7 मिलिमिटर पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यात मागील दोन दिवसाच्या उघडीपीनंतर गुरुवारी शिराळ्यासह अन्य भागात पावसाची रिमझिम सुरु राहिली. शिराळा, इस्लामपूर, पलूस व कडेगाव तालुक्‍यात परिसरात सकाळपासून रिपरिप सुरु आहे. खानापूर, मिरज मध्य आणि पूर्व भागात ढगाळी वातावरण आणि अधून-मधून पावसाच्या सरी बसरल्या. सांगली शहरामध्येही दिवसभर ढगाळ वातावरण होते, अधून-मधून रिमझिम पाऊस झाला. 

जिल्ह्यात गेल्या 24 तासात पाऊस व कंसात 1 जूनपासून आजअखेर पडलेल्या पाऊस असा (मि.मी.) - मिरज 1.7 (338.8 मि.मी.), तासगाव 1.6 (306.8), कवठेमहांकाळ 3.1 (375), वाळवा-इस्लामपूर 2.5 (372.6), शिराळा 14.7 (875.7), कडेगाव 3.8 (314.5), पलूस 3.3 (265.8), खानापूर-विटा 2.2 (412.2), आटपाडी 0.3 (264.6), जत 0.1 (211.8). 

नद्यांची पाणीपातळी पुढीप्रमाणे (फूट) ः 
कृष्णा पूल, कराड 9.2, बहे 6.2, ताकारी 14.4, भिलवडी 11.3, आयर्विन सांगली 11.30, अंकली 17.5 आणि म्हैसाळ बंधारा 28 फूट. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 80 TMC reserves in Chandoli, dam filled 88 per cent