सांगलीत नवे 811 रुग्ण; 957 कोरोनामुक्त; 35 मृत्यू

शैलेश पेटकर
Monday, 21 September 2020

सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात झालेल्या चाचण्यांमध्ये 811 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.  तर सांगली जिल्ह्यातील 32 आणि परजिल्ह्यातील तीन अशा 35 जणांचा मृत्यू झाला.

सांगली : जिल्ह्यात आज दिवसभरात झालेल्या चाचण्यांमध्ये 811 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले, तर सांगली जिल्ह्यातील 32 आणि परजिल्ह्यातील तीन अशा 35 जणांचा मृत्यू झाला. तसेच आज 957 रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण रुग्णसंख्या 29 हजार 332 झाली असून, आतापर्यंत 1102 जणांचा मृत्यू झाला आहे. 

1115 आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये 536 जण बाधित आढळले. 1220 अँटिजेन चाचण्यांमध्ये 334 जण बाधित आढळले. आटपाडी तालुक्‍यात 47, जत तालुक्‍यात 29, कडेगावमध्ये 38, कवठेमहांकाळमध्ये 47, खानापूरमध्ये 32, मिरजमध्ये 76, पलूसमध्ये 38, शिराळा तालुक्‍यात 26, तासगावमध्ये 59, तर वाळवा तालुक्‍यात 112 बाधित आढळून आले. 
दिवसभरात जत 2, कडेगाव 2, कवठेमहांकाळ 1, खानापूरमध्ये 2, मिरज 4, पलूस 1, तासगाव 3, शिराळा 4, वाळवा 7, महापालिका क्षेत्रात 6 रुग्णांचा मृत्यू झाला. परजिल्ह्यातील ठाणे येथील एक, तर कर्नाटकातील दोघांचा मृत्यू झाला. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील 1163 रुग्ण चिंताजनक आहेत. त्यापैकी 969 ऑक्‍सिजनवर, 73 नोझल ऑक्‍सिजनवर आणि 114 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. 9640 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

पालिका क्षेत्रात 307 रुग्ण 
आज दिवसभरात महापालिका क्षेत्रात 307 जणांना बाधा झाली. त्यात सांगली-कुपवाड शहरातील 240, तर मिरजेतील 67 जण आहेत. महापालिका क्षेत्राची रुग्णसंख्या 12,207 इतकी झाली आहे. 

जिल्ह्यातील चित्र 

  • नवे रुग्ण - 811 
  • जपर्यंतचे पॉझिटिव्ह रुग्ण-29,332 
  • सध्या उपचार घेणारे रुग्ण- 9640 
  • आजपर्यंत बरे झालेले रुग्ण- 18590 
  • आजअखेर जिल्ह्यातील मृत-1102 
  • परजिल्ह्यातील मृत रुग्ण- 158 
  • पॉझिटिव्हपैकी चिंताजनक- 1163 
  • आजअखेरचे ग्रामीण रुग्ण- 12729 
  • आजअखेरचे शहरी रुग्ण- 4396 
  • महापालिका क्षेत्र रुग्ण- 12207 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 811 new patients in Sangli; 957 people corona free; 35 deaths