सोलापुरात सापडले नवे 83 पॉझिटिव्ह! चार महिलांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

ठळक बाबी... 

  • शहरातील रुग्ण संख्या आता दोन हजार 582; एक हजार 420 व्यक्‍तींची कोरोनावर मात 
  • आजच्या चार मृत्यूसह मृतांची संख्या आता 267; 895 रुगणांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार 
  • होम क्‍वारंटाईनमध्ये आहेत एक हजार 152 व्यक्‍ती; संस्थात्मक विलगीकरणात एक हजार 118 संशयित 
  • सद्यस्थितीत 188 जणांचे अहवाल पेंन्डिंग; आज 36 जणांना सोडले घरी 
  • संजय गांधी नगर (विजयपूर रोड), देगाव नाका, हब्बू वस्ती, मुरारजी पेठ आणि सहारा नगर (आयडीयन हायस्कूलजवळ) येथील महिला रुग्णांचा मृत्यू 

सोलापूर : शहरात शनिवारी (ता. 4) 83 व्यक्‍तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर चार महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता मृतांची संख्या 276 झाली असून एकूण रुग्णसंख्या दोन हजार 582 वर पोहचली आहे. तर आता शहरातील 188 संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत.

आज शहरातील हिंगुलांबिका मंदिर (गणेश पेठ), राजस्व नगर, गरिबी हटाव झोपडपट्टी, माजी सैनिक नगर, सोनी नगर, कोर्णाक नगर (विजयपूर रोड), मिल्लत नगर, आशिया नगर, कल्याण नगर, गोविंद नगर (जुळे सोलापूर), बालाजी सोसायटी (होटगी रोड), भूषण नगर (रामवाडी), किसान नगर, गांधी नगर (अक्‍कलकोट रोड), अमरनाथ नगर, सन्मित्र नगर (शेळगी), नागणे अर्पाटमेंट, शाहीर वस्ती (भवानी पेठ), विजयालक्ष्मी नगर (नई जिंदगी), स्लॉटर हाऊस (बापूजी नगर), केगाव (नागनाथ मंदिराजवळ), विद्या नगर, पुष्पलता हौसिंग सोसायटी (रंगराज नगर), मुरारजी पेठ, दमाणी नगर, स्वागत नगर (कुमठा नाका), सुनिल नगर (एमआयडीसी), समर्थ नगर (सिटी हॉस्पिटल), रेसिडेन्सी क्‍वार्टर (सिव्हिल हॉस्पिटल), पाच्छा पेठ, मार्कंडेय नगर, शुक्रवार पेठ, मार्केट सोलापूर, ऐश्‍वर्या हॉटेलजवळ, मुरारजी पेठ, श्रध्दा विहार (मोदी), जोडभावी पेठ, इंद्रधनू (उत्तर सदर बझार), अवैद्या नगर (हैदराबाद रोड), कल्याण नगर, भारत नगर (मुळेगाव रोड), नाथ रेसिडन्सी, मराठा वस्ती, होमकर नगर (भवानी पेठ), काजल नगर, राघवेंद्र नगर, मडकी वस्ती, कर्णिक नगर, भवानी पेठ, बेगम पेठ, सोनाई नगर, उत्तर कसबा, जुना एम्प्लॉयमेंट चौक, रेल्वे लाईन्स, मंगळवेढेकर चाळ, सिव्हिल हॉस्पिटलमागे, बुधवार पेठ, प्रताप नगर, साखर पेठ, निराळे वस्ती, वारद फार्म (पुणे रोड), नेहरु नगर, सुंदरम नगर, जोडभावी पेठ, अंबिका नगर याठिकाणी नवे रुग्ण आढळले आहेत. 

ठळक बाबी... 

  • शहरातील रुग्ण संख्या आता दोन हजार 582; एक हजार 420 व्यक्‍तींची कोरोनावर मात 
  • आजच्या चार मृत्यूसह मृतांची संख्या आता 267; 895 रुगणांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार 
  • होम क्‍वारंटाईनमध्ये आहेत एक हजार 152 व्यक्‍ती; संस्थात्मक विलगीकरणात एक हजार 118 संशयित 
  • सद्यस्थितीत 188 जणांचे अहवाल पेंन्डिंग; आज 36 जणांना सोडले घरी 
  • संजय गांधी नगर (विजयपूर रोड), देगाव नाका, हब्बू वस्ती, मुरारजी पेठ आणि सहारा नगर (आयडीयन हायस्कूलजवळ) येथील महिला रुग्णांचा मृत्यू 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 83 new positives found in Solapur Four women died