जिल्ह्यात नवे 865 रुग्ण; 40 मृत्यू; 613 कोरोनामुक्त; मनपा क्षेत्रात 238 जणांना झाली बाधा 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020


सांगली ः जिल्ह्यात आज 865 जणांना कोरोनाची बाधा झाली, तर दिवसभरात 613 रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण बाधितांची संख्या 25 हजार 653 झाली आहे. दरम्यान, दिवसभरात 40 जणांचा मृत्यू झाला आहे.

सांगली ः जिल्ह्यात आज 865 जणांना कोरोनाची बाधा झाली, तर दिवसभरात 613 रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण बाधितांची संख्या 25 हजार 653 झाली आहे. दरम्यान, दिवसभरात 40 जणांचा मृत्यू झाला आहे. 

आज 1319 आरटीपीसीआर तपासण्या झाल्या. त्यात 387 बाधित आढळले. 1997 अँटीजेन तपासण्यांत 500 बाधित आढळले. आटपाडी तालुक्‍यात 39, जत 30, कडेगाव 74, कवठेमहांकाळ 55, खानापूर 29, मिरज 143, पलूस 78, शिराळा 45, तासगाव 65, वाळवा 69 तर मनपा क्षेत्रात 238 बाधित आढळले. 

\कडेगाव तालुक्‍यात 3, कवठेमहांकाळ 4, खानापूर 2, मिरज 2, पलूस 3, तासगाव 2, शिराळा 3, वाळवा 8 आणि मनपा क्षेत्रातील 11 रुग्णांचा मृत्यू झाला. याशिवाय परजिल्ह्यातील दोघांचा आज मृत्यू झाला. सध्या 813 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर 111, हायफ्लो ऑक्‍सिजनवर 54 तर इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर 10 रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. या स्थितीत जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 24 हजार 788 वर पोचली आहे. 

 

आजचे बाधित ः 865 
उपचाराखाली ः 9247 
बरे झालेले ः 15437 
एकूण मृत्यू ः 969 
एकूण बाधित ः 25653 
चिंताजनक ः 1039 
ग्रामीण बाधित ः 11181 
शहरी बाधित 3398 
मनपा क्षेत्र ः 11074 
... 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 865 new patients in the district; 40 deaths; 613 coronal free; 238 people were affected in the municipal area

Tags
टॉपिकस
Topic Tags: