सांगली जिल्ह्यात नवे 886 रुग्ण; 32 जणांना मृत्यू; दिवसभरात 716 कोरोनामुक्त 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 September 2020

716 जणांनी कोरोनावर मात केल्याची दिलासादायक बातमी आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता 23 हजार 192 इतकी झाली आहे. 

सांगली : जिल्ह्यात आज नव्याने 886 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. उपचारादरम्यान 32 जणांचा मृत्यू झाला असून त्यात परजिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रात आज दिवसात आठ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्यानंतर रुग्णसंख्याही वाढत असताना दिवसभरात 716 जणांनी कोरोनावर मात केल्याची दिलासादायक बातमी आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता 23 हजार 192 इतकी झाली आहे. 
 

जिल्ह्याबरोबरच महापालिका क्षेत्रात कोरोनाचा उद्रेक वाढता आहे. महापालिका क्षेत्रात आज नव्याने 296 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आजपर्यंत केवळ महापालिका क्षेत्रातील बाधितांचा आकडा आता 10 हजारांहून अधिक झाला आहे. आज दिवसभरात आरटीपीसीआर 1285 चाचण्यांपैकी 332 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. रॅपिड अँटिजेन 1406 पैकी 585 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. 

जिल्ह्यातील आटपाडी तालुक्‍यात 51, जत तालुक्‍यात 35, कडेगावमध्ये 49, कवठेमहांकाळमध्ये 67, खानापूरमध्ये 29, मिरज तालुक्‍यात 107, पलुसमध्ये 63, शिराळा तालुक्‍यात 54, तासगावमध्ये 63, तर वाळवा तालुक्‍यात 72 रुग्ण आढळून आले. महापालिका क्षेत्रातील सांगली-कुपवाड शहरात 226, तर मिरज शहरात 70 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. 

जिल्ह्यातील 32 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये आटपाडी, जत, खानापूर तालुक्‍यातील प्रत्येकी एक, तर कडेगाव, पलुस तालुक्‍यातील दोघांचा समावेश आहे. कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्‍यातील प्रत्येकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला. मिरज आणि वाळवा तालुक्‍यात 10 जणांचा मृत्यू झाला. तसेच महापालिका क्षेत्रात आठ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये सांगली शहरातील 4, मिरज 3, तर कुपवाडमधील एकाचा समावेश आहे. सोनंद (सांगोला) येथील एकाचा मृत्यू झाला. 

 

  • आजअखेरचे पॉझिटिव्ह रुग्ण- 23192 
  • सध्या उपचार घेणारे रुग्ण- 9248 
  • आजअखेर बरे झालेले रुग्ण-13092 
  • आजअखेर जिल्ह्यातील मृत- 852 
  • पॉझिटिव्हपैकी चिंताजनक- 938 
  • आजअखेर ग्रामीण रुग्ण-9786 
  • आजअखेर शहरी रुग्ण-2979 
  • महापालिका क्षेत्र रुग्ण- 10427 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 886 new patients in Sangli district; 32 deaths; 716 corona free throughout the day