सांगली जिल्ह्यात नवे 9 रुग्ण; महापालिका क्षेत्रातील शंभर फुटी रस्त्यावर एका महिला; शिराळ्यात 4, आटपाडी 2, शिरगावमध्ये 1 रुग्ण 

1Corona_Danger_19
1Corona_Danger_19
Updated on

सांगली ः जिल्ह्यात आज नवे 9 रुग्ण मिळून आले आहेत. महापालिका क्षेत्रातील शंभरफुटी रस्त्यावरील पाकिजा मशीद समोरील कुदळे प्लॅट येथे 55 वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. महापालिका क्षेत्रात रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तसेच शिराळा तालुक्‍यातील मणदुर, किरनरेवाडी, शिराळा येथे चार रुग्ण मिळून आले आहेत. तासगाव तालुक्‍यातील शिरगाव येथे एकास लागण झाली आहे. निंबवडे (आटपाडी) येथे दोघांना, तर जत तालुक्‍यातील निगडी खुर्द येथे एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 268 झाली. सद्यस्थितीत 124 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर मिरजेतील कोरोना रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. 

 


पाच चिंताजनक 
साळसिंगे (ता. खानापूर) येथील 60 वर्षीय व्यक्ती, कदमवाडी (कवठेमहांकाळ) येथील 50 वर्षीय महिला, विटा (हनुमंतनगर) येथील 34 वर्षीय पुरुष, वांगी (कडेगाव) येथील 69 वर्षीय पुरुष, अंकले (जत) येथील 66 वर्षीय पुरुष अशा पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 

  • जिल्ह्याची स्थिती (दुपारी 2 पर्यंत) 
  •  बुधवार आढळलेले बाधित - 9 
  •  एकूण रुग्ण - 268 
  •  उपचार घेणारे रुग्ण - 124 
  •  बरे झालेले रुग्ण - 135 
  •  आजवर मृत्यू झालेले - 9 
  •  पॉझिटिव्ह पण चिंताजनक - 5 
  •  ग्रामीणमधील बाधित - 208 
  •  शहरी भागातील बाधित - 48 
  •  महापालिका क्षेत्र- 12 


 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com