गुप्तधनाच्या कारणातून सांगलीत 9 जणांची हत्या; दोघांनी जेवणातून विष घालून मारलं; जाणून घ्या नेमकं प्रकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sangli Crime News

या प्रकरणी पोलीस तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलीय.

गुप्तधन प्रकरण: सांगलीत सामूहिक आत्महत्या नाही तर 9 जणांची हत्या

सांगलीमधील (Sangli District) मिरज तालुक्यातील (Miraj Taluka) म्हैसाळ (Mhaisal) येथील एकाच कुटुंबातील 9 जणांनी सामूहिक आत्महत्या केल्यानं जिल्हा हादरला होता. ही आत्महत्या सावकारी कर्जापोटीच झाल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं होतं. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात (Miraj Rural Police Station) तब्बल 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आता म्हैसाळमधील या सामूहिक आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय.

या प्रकरणी पोलीस तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलीय. त्या 9 जणांची आत्महत्या नसून हत्याकांड झाल्याचं समोर आलंय. दोघांनी या लोकांच्या जेवणात विष घालून त्यांना मारल्याचं तपासात उघड झालंय. यामध्ये गुप्तधनाच्या कारणामुळं हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं असून या प्रकरणी एका मंत्रिकासह एकाला पोलिसांनी अटक केलीय, अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिलीय.

हेही वाचा: आमदार क्षीरसागरांकडून जीवे मारण्याची धमकी; इंगवलेंची पोलीस अधीक्षकांकडं तक्रार

या घटनेत नव्यानं अटक केलेले दोघे संशयित आरोपी हे मयतांच्या घरी येत होते, असंही समोर आलंय. यावेळी आरोपी आणि मयतामध्ये गुप्तधनाच्या चर्चा होत होत्या, अशीही माहिती आहे. त्यामुळं गुप्तधनाच्या विषयावरूनच यातून 9 जणांच्या हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. यामध्ये दोन व्यक्तींनी या लोकांच्या जेवणात विष घालून त्यांना मारलं असून या प्रकरणी दोघंजण अटकेत आहेत, तर दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहितीही गेडाम यांनी दिलीय.

हेही वाचा: महाराष्ट्रात लवकरच भाजप-सेनेचं सरकार; दीपक केसरकरांनी व्यक्त केला विश्वास

या खून प्रकरणी आब्बास महमंदअली बागवान (वय ४८) रा. मुस्लीम बाशा पेठ, मुलेगाव रोड, सरवदेनगर सोलापूर आणि धीरज चंद्रकांत सुरवशे (वय ३०) रा. वसंत विहार ध्यानेश्वरी नगर, प्लॉट नं ५९ जुना पुणानाका, सोलापूर या दोघांना अटक करण्यात आलीय. त्यामुळं गुप्तधनाच्या विषयावरूनच ही हत्या झाल्याचं आता समोर आलंय.

Web Title: 9 People Commit Suicide In Mhaisal Sangli Case Shocking Revelation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sanglimiraj
go to top