esakal | बेळगावात होणार 907 अतिथी शिक्षकांची नेमणूक
sakal

बोलून बातमी शोधा

the 907 guest teacher appoint in belgium the information ordered by educational department

सरकारी प्राथमिक शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागांची माहिती गट शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत देण्याची सूचना करण्यात आली आहे. 

बेळगावात होणार 907 अतिथी शिक्षकांची नेमणूक

sakal_logo
By
मिलिंद देसाई

बेळगाव : शिक्षण खात्याने सरकारी शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागांची माहीती मागवली असून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागांवर 907 अतिथी शिक्षकांची लवकरच नेमणूक केली जाणार आहे. कोरोनामुळे अद्याप शाळा सुरू झालेल्या नाहीत. मात्र सरकारकडून पुढील महिन्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यापूर्वी सरकारी प्राथमिक शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागांची माहिती गट शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत देण्याची सूचना करण्यात आली आहे. 

शैक्षणिक जिल्ह्यात रामदुर्ग आणि सौंदत्ती तालुक्यामध्ये शिक्षकांच्या जागा अधिक प्रमाणात रिक्त आहेत. तर सर्वात कमी जागा बेळगाव शहर व तालुक्यात असून गेल्या काही दिवसांपासून रिक्त जागांची माहिती घेतली जात आहे. त्या जागांवर अतिथी शिक्षकांची नेमणूक केली जाणार असून सरकारी शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. मात्र त्या जागांवर कायमस्वरूपी शिक्षकांची नेमणूक केण्याऐवजी दरवर्षी अतिथी शिक्षकांची नेमणूक केले जाते. मात्र अतिथी शिक्षकांची नेमणूक केल्यानंतर त्यांच्या पगार वेळेत दिला जात नाही त्यामुळे अतिथी शिक्षकांना त्रास सहन करावा लागतो याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

हेही वाचा - शिवसेना आमदार जाधव यांच्या प्रश्नाला ठेकेदार मात्र निरुत्तर
 

2019-2020 च्या शैक्षणिक वर्षासाठी भरती करण्यात आलेल्या शिक्षकांचा पगार 8 महिन्यांनी देण्यात आला होता, त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त झाली होती. कोरोनाच्या संकटामुळे यावेळी अतिथी शिक्षकांची नेमणूक होणार नाही अशी चर्चा डीएलएड धारकांमधून होत होती. परंतु शाळा सुरू करण्यापूर्वी अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली तर पहिल्या दिवसापासून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल असे मत व्यक्त होत आहे. शिक्षकांच्या नेमणुकीमुळे बेरोजगार असलेल्या डीएलएड धारकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. सध्या शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागांची माहिती घेतली जात आहे. त्यांनतर विविध शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागांसाठी अर्ज मागविले जाणार आहेत. अशी माहिती शिक्षण खात्याकडून देण्यात आली.

"शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता अतिथी शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यासाठी 907 जागा मंजूर झाल्या आहेत."

- अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी

हेही वाचा - कोल्हापुरात १७ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह

संपादन - स्नेहल कदम 

loading image
go to top