esakal | महापालिका क्षेत्रात शनिवारी सापडले 92 नवे पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

92 new positives found in municipal area on Saturday

​सांगली : महापालिका क्षेत्रात आज कोरोनाचे 92 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

महापालिका क्षेत्रात शनिवारी सापडले 92 नवे पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : महापालिका क्षेत्रात आज कोरोनाचे 92 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी नव्याने सापडलेल्या रुग्णाच्या परिसरात औषध फवारणीसह अन्य खबरदारीच्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. यामध्ये सांगलीत 73 आणि मिरजेत 19 रुग्ण आहेत. यामुळे महापालिका क्षेत्रातील एकूण रुग्णांची संख्या 1558 इतकी झाली आहे. 

आज सापडलेल्या रुग्णांमध्ये खणभाग 12, सांगलीवाडी हरुगडे प्लॉट 6, विश्रामबाग 4, पवार प्लॉट हरिपूर रोड 6, विजयनगर 3, कोल्हापूर रोड 6, सुर्यवंशी प्लॉट 2, मंगलमुर्ती कॉलनी 2, हसनी आश्रमजवळ 1, संजयनगर 2, चांदणी चौक, गणेशनगर, शामराव नगर, शेवाळे गल्ली, हडको कॉलनी या ठिकाणी प्रत्येकी एक, वखारभाग 3, कुपवाड राणाप्रताप चौक 2, कुपवाड 1, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज 8, पंढरपूर रोड 2, अमनननगर, खतीबनगर, वंटमुरे कॉर्नर प्रत्येकी एक या परिसरात रुग्ण आढळले आहेत. 

आज आरटीपीसीआर चाचणीत 80 नवे रुग्ण आढळून आले तर रॅपिड अँटीजेन चाचणीमध्ये 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आज महापालिकाक्षेत्रात पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 92 वर पोहचली आहे. नव्याने 92 रुग्ण सापडल्याने आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार नव्याने रुग्ण सापडलेल्या परिसरात औषध फवारणी तसेच नजीकच्या संपर्कातील लोकांची माहिती घेतली जात आहे. याचबरोबर उपायुक्त स्मृती पाटील, सहायक आयुक्त पराग कोडगुले, अशोक कुंभार, आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे, डॉ. सुनील आंबोळे, डॉ. वैभव पाटील तसेच वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, याकूब मद्रासी, बंडा जोशी यांच्या टीमकडून वेगवेगळ्या ठिकाणी खबरदारीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. 


अँटीजेन चाचण्या कमी... 
महापालिका क्षेत्रात रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात येत आहेत. आज या चाचण्या कमी करण्यात आल्या. गेल्या 13 दिवसात करण्यात आलेल्या या चाचण्यांमध्ये 3420 नागरिकांचे स्वॅब तपासण्यात आले. यामध्ये 328 रुग्ण पॉझिटीव्ह आले. यामध्ये आज पहिल्यांदाच केवळ 68 चाचण्या करण्यात आल्या. महापालिका क्षेत्रातील दहा नागरी आरोग्य केंद्रांमध्ये या चाचण्या केल्या जातात. आज सांगलीतील दोन आणि मिरजेतील एकाच केंद्रावर चाचण्या करण्यात आल्या. इतर केंद्रांवर आज चाचण्या केल्या नाहीत. हनुमान नागरी आरोग्य केंद्रावर 52 चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये 10 रुग्ण आढळले. तर जामवाडीच्या केंद्रावर 13 चाचण्या केल्या. यामध्ये एक रुग्ण पॉझिटीव्ह आला. तर मिरजेतील एका केंद्रावर तीन चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये एक रुग्ण पॉझिटीव्ह आला.


संपादन : प्रफुल्ल सुतार