जिल्ह्यात नवे 936 रूग्ण : 38 जणांचा मृत्यू...दिवसभरात 875 कोरोनामुक्त : सद्यस्थितीत 961 जण चिंताजनक 

घनश्‍याम नवाथे
Friday, 11 September 2020

सांगली-  जिल्ह्यात आज नव्याने 936 कोरोना बाधित रूग्ण आढळले. त्यापैकी 210 रूग्ण महापालिका क्षेत्रातील आहेत. ग्रामीण भागात आज वाळवा तालुक्‍यात सर्वाधिक 127 रूग्ण आढळले. जिल्ह्यातील 36 जणांचा आणि परजिल्ह्यातील दोघांचा अशा 38 जणांचा आज मृत्यू झाला. तर आज 875 जण कोरोनामुक्त झाले. सद्यस्थितीत 961 जण चिंताजनक आहेत. 

सांगली-  जिल्ह्यात आज नव्याने 936 कोरोना बाधित रूग्ण आढळले. त्यापैकी 210 रूग्ण महापालिका क्षेत्रातील आहेत. ग्रामीण भागात आज वाळवा तालुक्‍यात सर्वाधिक 127 रूग्ण आढळले. जिल्ह्यातील 36 जणांचा आणि परजिल्ह्यातील दोघांचा अशा 38 जणांचा आज मृत्यू झाला. तर आज 875 जण कोरोनामुक्त झाले. सद्यस्थितीत 961 जण चिंताजनक आहेत. 

जिल्ह्यातील रूग्णसंख्येने आज 21 हजाराचा टप्पा पार केला. आज रात्री नऊपर्यंत एकुण रूग्णसंख्या 21 हजार 370 पर्यंत पोहोचली होती. आज दिवसभरात 936 कोरोना बाधित रूग्ण आढळले. त्यापैकी 210 महापालिका क्षेत्रातील आहेत. त्यामध्ये सांगलीतील 137 आणि मिरजेतील 73 रूग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात आज आटपाडी तालुका 71, जत 45, कडेगाव 79, कवठेमहांकाळ 78, खानापूर 60, मिरज 74, पलूस 85, शिराळा 39, तासगाव 68, वाळवा 127 याप्रमाणे कोरोना बाधित रूग्ण आढळले. आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचणीत 877 रूग्ण तपासले, त्यामध्ये 389 रूग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर ऍन्टीजेन चाचणीत 2404 रूग्ण तपासले, त्यामध्ये 552 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. 

आज दिवसभरात जिल्ह्यात 36 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये सांगलीतील सात, मिरज चार, बामणोली दोन, सावळज दोन, मांजर्डे, चिंचणी, आटपाडी, बुधगाव, बाज, डोंगरसोनी, वायफळे, पाडळी, बेनापूर, दिघंची, आष्टा, बनाळी, पलूस, रेठरेधरण, कसबे डिग्रज, फार्णेवाडी, इस्लामपूर, सावळज, वळसंग, खानापूर, नागराळे येथील रूग्णांचा समावेश आहे. तर अकिवाट व जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आजअखेर 798 जणांचा तसेच परजिल्ह्यातील 133 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 961 जण चिंताजनक आहेत. त्यापैकी 810 जण ऑक्‍सिजनवर, 42 जण नेझल ऑक्‍सिजनवर आणि 109 जण व्हेंटीलेटरवर आहेत. 

जिल्ह्यातील चित्र- 

 • आजअखेरचे पॉझिटीव्ह रूग्ण- 21370 
 • सध्या उपचार घेणारे रूग्ण- 8950 
 • आजअखेर बरे झालेले रूग्ण-11622 
 • आजअखेर जिल्ह्यातील मृत- 798 
 • परजिल्ह्यातील मृत- 133 
 • पॉझिटीव्हपैकी चिंताजनक- 961 
 • आजअखेर ग्रामीण रूग्ण-8842 
 • आजअखेर शहरी रूग्ण-2743 
 • महापालिका क्षेत्र रूग्ण- 9785 
   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 936 new patients in the district: 38 deaths. 875 corona free in a day