महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेमार्फत (Maharashtra State AIDS Control Organisation) ‘एआरटी’ केंद्र चालवले जाते.
सांगली : जिल्ह्यात आठ वर्षांत एड्सबाधित (AIDS) रुग्णांची संख्या घटली आहे. ‘एआरटी’ औषधांमुळे एड्सबाधितांना नवे आयुष्य लाभत आहे. २००४ मध्ये बाधितांची टक्केवारी २४.७७९ होती. ती २०१९ मध्ये ०.७१२ इतकी झाली. आजच्या स्थितीत जिल्ह्यात १० हजार ९०० रुग्ण आजारासह जगत आहेत. त्यांतील अनेकांचे विवाह झाले आहेत. त्यांची मुले संसर्गमुक्त आहेत, हे विशेष. एआरटी केंद्रांसह सामाजिक कार्यकर्ते, संस्था, परिचारिकांच्या प्रयत्नाने जिल्ह्यात रुग्णांची संख्या घटतेय, हे सुचिन्ह आहे.