
कुपवाड : तानंग (ता.मिरज) येथील एका शेतकऱ्याच्या द्राक्षबागेतून बावीस हजारांचे अँगल चोरी करणाऱ्या चौघांवर कुपवाड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. प्रथमेश अनिल कांबळे (तासगाव फाटा, सुभाषनगर, ता. मिरज), राकेश गस्ते, कृणाल व विनायक (पूर्ण नाव पत्ता नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. प्रसाद संजय माळी (वय २७, तानंग, ता. मिरज) यांनी त्याची फिर्याद पोलिसात दिली.