Sangli hit and run drunk driver

Sangli hit and run drunk driver

sakal

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

Sangli hit and run drunk driver : सांगली शहरात नशेत असलेल्या कार चालकाने बेदरकारपणे वाहन चालवत चार पोलिसांसह अकरा जणांना उडवले. पटेल चौक ते टिळक चौकदरम्यान थरार माजला. जमावाने चालकास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. सुदैवाने जीवितहानी टळली.
Published on

सांगली : नशेत धुंद असणाऱ्या कार चालकाने बेदरकार वाहन चालवत चार पोलिसांसह अकरा जणांना उडवले. पटेल चौक ते गणपती मंदिर आणि टिळक चौक या टप्प्यात अवघ्या दहा ते बारा मिनिटांत असंख्य वाहनांना धडका देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. टिळक चौकात दुचाकी आडवी आल्याने कार थांबली आणि बेधुंद कार चालकास जमावाने चोपत पोलिसांच्या हवाली केले. ‘हिट अँड रन’च्या या थरारत सुदैवाने कोणतीही जीवत हानी झालेली नाही. आज रात्री पावणे आठच्या सुमारास हा थरार झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com