
शिरढोण : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील टोलनाक्याजवळ सीएनजी मोटारीने पेट घेतल्याने एका युवकाचा होरपळून मृत्यू झाला. गणेश दत्तात्रय माळवदे (वय २४, रा. कवठेमहांकाळ) असे त्याचे नाव आहे. हा अपघात रविवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या दरम्यान घडला. या अपघाताची नोंद कवठेमहांकाळ पोलिसांत रात्री दाखल झाली.