Sangli Crime : वेदांत बंडगर खून प्रकरणातील पसार संशयित चौगुलेचा जीवन संपविण्याचा प्रयत्न

वेदांत बंडगर खून प्रकरणातील पसार संशयित सागर उर्फ नानासो माणिक चौगुले याने आज विषारी द्रव्य प्रशान करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
Sagar Chaugule

Sagar Chaugule

sakal

Updated on

सांगली - वेदांत बंडगर खून प्रकरणातील पसार संशयित सागर उर्फ नानासो माणिक चौगुले (रा. अग्रण धुळगाव, ता. कवठेमहांकाळ) याने आज विषारी द्रव्य प्रशान करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला तातडीने कवठेमहांकाळ रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यतात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती निरीक्षक प्रविणकुमार कांबळे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com