चिक्कोडीत ABVPकडून तीव्र आंदोलन; वसतिगृह सुरू करण्याची मागणी

यावेळी हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी होते.
ABVP Protest
ABVP ProtestSakal

चिक्कोडी : शहरात तेरापेक्षा विविध भाषेच्या शाळा, महाविद्यालये आहेत. त्यासाठी तालुका व शहरातील विविध तालुक्यातील 13 हजारापेक्षा अधिक मुले, मुली दहावीनंतरच्या शिक्षणासाठी येतात. सर्वसामान्य मुलांना दररोज येण्यासाठी मोठी समस्या निर्माण होत असल्याने शहरात दहावीनंतरच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून वसतिगृह निर्माण करावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) मार्फत करण्यात आली. त्यासाठी शहरात मोर्चा काढून बसव सर्कलमध्ये मानवी साखळी करून गुरुवारी (ता. 24) सकाळी 11 वाजता तीव्र आंदोलन केले. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी होते. (ABVP Protest In Chikkodi Karnataka)

चिक्कोडी हे शैक्षणिक जिल्ह्याचे मुख्य केंद्र आहे. शहरात 13 पेक्षा जादा शाळा-महाविद्यालये आहेत. शहरात मागासवर्गीय कल्याण खात्याचे दहावीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी कोणतेही वसतिगृह नाही. विद्यार्थ्यांना लांबून बसप्रवास करत शिक्षणासाठी यावे लागते. त्यामुळे होणारा त्रास थांबावा, वसतिगृहात थांबून योग्य शिक्षण मिळावे, कित्येक वेळा मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह सुरू करण्यासाठी निवेदने दिली आहेत. मात्र नेतेमंडळी, अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

ABVP Protest
बोगस प्रमाणपत्र धारकांसाठी समर्पण योजना; राज्य शासनाचा प्रस्ताव

चिक्कोडी शहरात 500 विद्यार्थी, 200 विद्यार्थिनींचे स्वतंत्र विद्यार्थी वसतिगृह मंजूर करावे, अशी मागणी केली आहे.

आंदोलनात तहसीलदार एन. बी. गेज्जी, इतर मागासवर्गीय कल्याण खात्याचे अधिकारी सौदागर, चिक्कोडीचे उपनिरीक्षक यमनाप्पा मांग आदींनी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढली. विद्यार्थी आपल्या आंदोलनावर ठाम होते. मुख्य महामार्ग अडवून धरल्याने तीन तास वाहतूक कोंडी झाली. अनेकाना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला. नेतेमंडळी व सरकारपर्यंत मागण्या मान्य करेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार होते.

अखेर अहिंद नेते महावीर मोहिते यांनी मध्यस्थी करून अधिकाऱ्यांशी मोबाईलवर संपर्क साधून विद्यार्थ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तहसीलदार एन. बी. गेज्जी यांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेतले. शहरात चार किलो मीटर अंतरापर्यंत निपाणी-मुधोळ संकेश्वर-जेवरगी राज्य महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गुरुवारी आठवडी बाजार असल्याने व्यापारयांचे हाल झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com