अथणीत ACB ची धडक; नैर्मल्य विभागाचे दोन अधिकारी जाळ्यात

अथणीत ACB ची धडक; नैर्मल्य विभागाचे दोन अधिकारी जाळ्यात
Updated on

अथणी : येथील ग्रामीण पाणी पुरवठा आणि नैर्मल्य विभागाचे सहाय्यक अभियंता राजेंद्र इंद्राप्पा परनाकर व व्यवस्थापक दीपक कृष्णाजी कुलकर्णी यांच्यावर लाच घेताना एसीबी पथकाने बुधवारी (ता. २२) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कारवाई करून अटक केली. कंत्राटदारांकडून 68 हजाराची लाच मागितल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या घटनेमुळे अथणी तालुक्यात एकच खळबळ उडाली.

याबाबत अधिक माहिती अशी,

जलजीवन मिशन योजना कामासाठी बेळगाव येथील कंत्राटदाराकडून दोन अधिकारयांनी लाच मागितली होती. ग्रामीण पाणी पुरवठा आणि नैर्मल्य विभाग कार्यालयातील व्यवस्थापक दीपक कुलकर्णी यांना 68 हजाराची लाच घेताना एसीबी पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. तातडीने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. एका कंत्राटदाराच्या तक्रारीनुसार एसीबी पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

अथणीत ACB ची धडक; नैर्मल्य विभागाचे दोन अधिकारी जाळ्यात
महापौरांनी बालिशपणा सोडावा: अन्यथा न्यायालयात जाऊ; BJP चा इशारा

बरेच अधिकारी कार्यालय सोडून बाहेर आहेत. भ्रष्टाचार निर्मुलन पथकाने (एसीबी) धडक कारवाई केली. कामासाठी कंत्राटदाराने पैसे मागितल्याने कारवाई झाली आहे. एकूण रक्कमेच्या 3 टक्के कमिशनची मागणी केली होती. तीन वर्षात ही पहिलीच कारवाई आहे. एसबी पथकाचे बी. एस. न्यायगौडर यांच्या नेतृत्वाखाली डीवायएसपी करुणाकर शेट्टी, इन्स्पेक्टर अडवेश गुदग्याप्पाण्णा, सुनीलकुमार यांनी ही कारवाई केली. कार्यालयापुढे कंत्राटदारांनी गर्दी केली होती. या कारवाईमुळे इतर कार्यालये शांत दिसत आहेत. सर्व अधिकारी आपल्या कामात गुंतले आहेत. सरकारी रुग्णालयाशेजारी कार्यालय असल्याने बघ्यांची गर्दी झाली होती. आरोपींना न्यायालयात हजर करून बेळगावला पाठविण्यात आले आहे. याबाबत अधिक चौकशी करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli Political News
Sangli Municipal Corporation Recruitment
Krishna River Crocodile Sighting
Karnataka Sugar Season Date Yet to Be Announced
Marathi News Esakal
www.esakal.com