मन हेलावून टाकणारी घटना ; संक्रांत साजरी करायला निघालेल्या दहाजणींवर काळाचा घाला

अमृत वेताळ
Friday, 15 January 2021

एकूण 17 महिला संक्रांती साजरी करण्यासाठी गोवा दौर्‍यावर निघाल्या होत्या.

बेळगाव : धारवाड तालुक्यातील इटगट्टी गावाजवळ टेम्पो आणि टिप्परमध्ये झालेल्या भीषण अपघातात अकराजण ठार झाले आहेत. यामध्ये  १ पुरुष आणि  १० महिलांचा समावेश आहे. आज पहाटे तीन वाजता हा अपघात झाला. 

धारवाड ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक महेंद्रकुमार यांच्या उपस्थितीत टेम्पोत अडकलेले दहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पहाटे 3 वाजता टेम्पोला इटिगट्टी येथे टिपरने धडक दिली. त्यात अकराजण जागीच ठार झाले आहेत. एकूण 17 महिला संक्रांती साजरी करण्यासाठी गोवा दौर्‍यावर निघाल्या होत्या.

गोव्याला जाण्यापूर्वी धारवाड जवळ अपघातात अकराजणांचा मृत्यू झाला. तर अन्य 5 जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी धारवाड येथील रुग्णालयात आणण्यात आले आहे.

हेही वाचा - आजी माजी आमदारांच्या गावात ईव्हीम मशीन पडले बंद -

 

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident in belgium near dharwad 10 women and 1 man dead in belgaum