एसटी चालकाचा सुटला ताबा अन.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident Between Bar and Tractor In Kolhapur Marathi News

कोल्हापूरात निगवे खालसा येथील अपघातात एक ठार
अकरा जखमी, एसटीची ट्रॅक्‍टर-ट्रॉलीला जोरदार धडक..

एसटी चालकाचा सुटला ताबा अन....

चुये (कोल्हापूर) : निगवे खालसा (ता.करवीर) येथील ओढ्याजवळ कोल्हापूर- गारगोटी मार्गावर आज रात्री पावणे नऊच्या सुमारास लाकडाने भरलेल्या ट्रॅक्‍टर ट्रॉलीला एसटी बसने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. दत्तात्रय तुकाराम पाटील (वय ५०, निगवे खालसा, ता. करवीर) असे त्यांचे नाव आहे. या अपघातात एसटी चालक विनायक महिपती मेंगाणे (वय ३२, रा. शेळेवाडी) यांच्यासह अकरा जण जखमी झाले असून त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इस्पुर्ली पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. ट्रॅक्‍टर चालक धनाजी जाधव यांनी फिर्याद दिली. 

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, ‘‘गारगोटीहून कोल्हापूरकडे बस (एमएच १४ बीटी १२१६) निघाली होती. यावेळी ट्रॅक्‍टर ट्रॉली (एमएच ०९ यू ५९१५) लाकडे भरून कोल्हापूरला निघाली होती. मात्र, एसटी चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने एसटी चालकाने ट्रॅक्‍टर-ट्रालीला पाठीमागून जोरदार धडक दिली. जोराच्या धडकेमध्ये चालकाच्या बाजूच्या निम्मा पत्रा कापत जावून बसने तीन वेळा उलटली.तर ट्रॉलीत भरलेली लाकडे ट्रॅक्‍टरच्या पुढील चाकापर्यंत पडली. 

हेही वाचा -कोल्हापूरातील तरुण का चालले या वाटेने...?

सर्व जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल
या घटनेची माहिती मिळताच इस्पुर्ली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सर्व जखमींना तीन रूग्णवाहिकांतून सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. रात्री दहानंतर सीपीआर परिसरात नातेवाईकांची गर्दी जमू लागली. दत्तात्रय पाटील यांचा उपचारापूर्वीच मूत्यू झाला. गौतम बाळू कांबळे (रा. विचारेमाळ, कोल्हापूर), बळवंत म. पाटील (वय ५२, रा. निगवे खालसा), विनायक महिपती मेंगाणे (वय ३२, रा. शेळेवाडी), वैशाली बाजीराव तानवडे (वय ४५, रा. वाळवे खुर्द, ता. कागल), अरविंद श्रीपती तानवडे (वय ५०, रा. वाळवे खुर्द), लता अरविंद तानवडे (वय ४०, रा. वाळवे खुर्द), बाजीराव महिपती तानवडे ( वय ४५, रा. वाळवे खुर्द), साताप्पा महादेव लोकरे (वय ६०, रा. कळंबा), पद्माकर झरीचंद कारमोरे (वय ४२, रा. सोलापूर), गुणवंत कारभारी मुंढे (वय ४५, रा. सोलापूर), राहूल पोपट लोंढे (वय ३६, रा. भोसरी) अशी जखमींची नावे आहेत.  

हेही वाचा- सांगली महापालिकेचा डॉमिनोझ्‌ पिझ्झाला दणका...

 बसच्या तीन पलट्या
एसटीने दिलेली धडक इतकी जोरदार होती की त्यानंतर एसटीने तीन पलट्या खाल्ल्या तर ट्रॅक्‍टर ट्रॉलीतील निलगिरीची लाकडे पुढच्या चाकापर्यंत येवून पडली. एसटी बसच्या एका बाजूचा पत्रा तर अक्षरशः कापला गेला आहे.