ट्रक-बसच्या भीषण अपघातात दोन्ही गाड्या जळून खाक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

बेळगाव-चोर्ला महामार्गानजीक कालमणी (ता. खानापूर) येथे सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास जवळ दूंडरगी (KA27 F0766) - पणजी बस व ट्रक यांच्या भीषण अपघातात दोन्ही गाड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या असून बसमधील 3 ते 4 प्रवासी किरकोळ भाजून जखमी झाले आहेत.

कर्ले : बेळगाव-चोर्ला महामार्गानजीक कालमणी (ता. खानापूर) येथे सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास जवळ दूंडरगी (KA27 F0766) - पणजी बस व ट्रक यांच्या भीषण अपघातात दोन्ही गाड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या असून बसमधील 3 ते 4 प्रवासी किरकोळ भाजून जखमी झाले आहेत.

सोमवारी रात्री आठच्या सुमाराला कर्नाटक परिवहन मंडळची बस गोव्यावरून दूंडरगीला (कर्नाटक) निघाली होती. रात्री साडेबाराच्या सुमाराला कालमणी क्रॉस जवळ बेळगाव वरून गोव्याच्या दिशेने जाणार ट्रक व बस यांच्यात भीषण धडकेत दोन्ही वाहनांना आग लागली. लगेच ताबडतोब बस मधील सर्व 21 प्रवाशांना उतरविण्यात येत असताना आगीने सर्व बसला घेरल्याने 3 ते 4 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याने त्यांना बेळगाच्या हॉस्पिटल मध्ये दाखल केल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी प्रथम जांबोटी पोलीस दाखल झाले त्यानंतर रात्री एकच्या सुमारास खानापूर पोलिसांची पोलीस व अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले.

बसने ट्रकच्या डिझेल टॅंकला धडक दिल्याने टॅंक फुटून बाजूला उडून पडला होता. त्यानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतल्याचे बोलण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident of bus and truck near khanapur sangli